अमरावती : जि.प.अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांवरील निलंबनाची प्रस्तावित कारवाई व वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषद शिक्षक समन्वय समितीने केली असून यामागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सोमवारी देण्यात आले.प्राथमिक विभागातील सन २०१६-१७ च्या संचमान्यतेच्या त्रुटीमुळे १० मुख्याध्यापकांवर निलंबनाची व २६० मुख्याध्यापकांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती अंतिम करून पडताळणी करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे त्रुटींसाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरणे उचित होणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे ही कारवाई बिनशर्त मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. अन्यथा २७ मार्चला जि.प.समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल व २७ मार्चनंतर कोणत्याही शाळेतून आॅनलाईन माहिती पाठविण्यात येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. यानंतरही कारवाई मागे न घेतल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी गोकुलदास राऊत, उमेश गोदे, आशीष भुयार, संजय भेले, विलास देशमुख, राजेश सावरकर, किरण पाटील, अरविंद बनसोड, सतीश तायडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांचे प्रस्तावित निलंबन रद्द करण्याची मागणी
By admin | Published: March 21, 2017 12:18 AM