लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, संविधानातील तरतुदीनुसार अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी शनिवारी इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.राज्य व केंद्र सरकारने धनगर जमातीला दिलेले अनुसूचित जातीत असलेला समावेश मान्य करून त्याची अंमलबजावणी अद्यापही न केल्यामुळे त्याविरुद्ध धनगर समाजात असंतोष पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या उपस्थितीत पक्ष, संघटना, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या आक्रोश आंदोलनात सहभाग घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता सरकारने तातडीने निकाली काढावा, यासाठी धनगर आरक्षण आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजातील विद्यार्थी, तरूण, तरूणी,महिला तसेच मेंढपाळ महिलांनी आरक्षणाचे मागणी कडे सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात खासदार विकास महात्मे, सुनीता महात्मे, संतोष महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुरेखा ठाकरे, निखिल ठाकरे, सुरेश उंद्रे, माधुरी धवळे, प्रेमा लव्हाळे, सुभाष गोहत्रे, जानराव कोकरे, अरूण बांबल, हरीश खुजे, अविनाश लव्हाळे, उमेश अवघड, तुषार पाठक, रवींद्र गोरटे, श्याम बोबडे, हरिभाऊ शिंदे, तुकाराम यमगर, गुणवंत कोकरे, नाना कोकरे, शेखर अवघड आदीचा सहभाग होता. यासोबत जिल्हाभरातील धनगर समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.
धनगर समाजाचा इर्विन चौकात आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:13 PM
धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, संविधानातील तरतुदीनुसार अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी शनिवारी इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देआंदोलनाद्वारे लक्षवेध : आरक्षण लागू करण्याची मागणी