वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. कोविड-१९ मुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पन्नास लाख रुपये अनुदान द्यावे. तीनही कंपन्यांकरिता एम.डी. इंडिया या जुन्याच टीपीएची तात्काळ नेमणूक करावी. वीज बिल वसुलीकरिता सक्ती करू नये, या मागण्यांसाठी सहायक अभियंता सोनार, यंत्रचालक विपिन रहाटे, ज्ञानेश्वर भिमटे, मुख्य तंत्रज्ञ कुमरे, वरिष्ठ तंत्रज्ञ मयूर वसु, प्रशांत मावळे, मंगेश इंगळे, तंत्रज्ञ धीरज बोबडे, पवन वडे आसेगाव पूर्णा वितरण केंद्र तसेच अचलपूर शहर-१ उपविभागातील कर्मचारी सहभागी होऊन येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर बाहेर घोषणा देऊन आंदोलन केले. शासन मागण्या मंजूर करीत नाही, तोपर्यंत कोविड सेंटर, पाणीपुरवठा, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील व वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. मात्र, इतर कामे बंद करून अत्यावश्यक नसलेला वीजपुरवठा बंद पडल्यास सुरू केला जाणार नाही, असे समितीतर्फे सांगण्यात आले.
आसेगावात महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:11 AM