शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

डेंग्यू : १७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:28 PM

शहरात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत तापाच्या १७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेंटिनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याबाबतचा अहवाल मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाला. त्यात १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देयवतमाळच्या सेंटिनल सेंटरचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत तापाच्या १७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेंटिनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याबाबतचा अहवाल मंगळवारी महापालिकेला प्राप्त झाला. त्यात १७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले जातात. ते रक्तजल नमुने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यामार्फत शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्या प्रयोगशाळेने १३ जुलैपर्यंतच्या नमुन्यांचा अहवाल महापालिका व जिल्हा हिवताप कार्यालयाला पाठविला आहे. त्यावरून शहरात डेंग्यूवर शिक्कामोर्तब झाले आहे. याआधी डॉ. मनोज निचत यांनी त्यांच्याकडील रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती माध्यमांसह आ. रवि राणा यांना दिली होती. मात्र, सेंटिनल सेंटरचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत ते रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या लेखी संशयित असल्याची भूमिका आयुक्त संजय निपाणे, आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व जिल्हा हिवताप अधिकारी सुरेश तरोडेकर यांनी घेतली होती. आता खासगी डॉक्टरांचा दावा खरा ठरला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी महापालिका प्रशासनाने आयएमए आणि खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. यात आयएमएचे अध्यक्ष डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. सुभाष तितरे, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. ऋषीकेश नागलकर, डॉ. रवि खेतान, डॉ. जे.पी. लढ्ढा सहभागी झाले.चैतन्य कॉलनीमधील चार रूग्णांचा समावेश

चैतन्य कॉलनीतील चार रुग्णांसह दस्तुरनगरमधील दोन रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघालेत. त्याशिवाय न्यू गणेशनगर, ख्रिस्त कॉलनी, रविनगर, दत्त कॉलनी, देशपांडे लेआऊट, यशोदानगर, टेलिकॉम कॉलनी, सबनिस प्लॉट, गाडगेनगरमध्ये राहणाºया रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. १७ पैकी ११ पुरुष व सहा महिला रुग्ण आहेत.सात डॉक्टरांकडे डेंग्यू पॉझिटिव्हज्या डॉक्टरांकडे डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेने दिला आहे, त्यापैकी पाच रुग्ण डॉ. समीर चौधरी, चार रुग्ण डॉ. मनोज निचत, तीन रुग्ण डॉ. विजय बख्तार, दोन रुग्ण डॉ. अद्वैत महल्ले, तर प्रत्येकी एक रुग्ण डॉ. सचिन काळे, डॉ. नीलेश पाचबुद्धे व डॉ. अजय डफळे यांच्याकडे दाखल होता.५३ हजार गृहभेटीडेंग्यू नियंत्रणासाठी २२ ते २९ जुलै दरम्यान ५३,७०४ गृहभेटी देण्यात आल्या. २,४४,८७६ लोकांपर्यंत महापालिकेचे पथक पोहोचले. मोहिमेदरम्यान १४२५ तापाचे रुग्ण आढळून आले. ६४० रक्तनमुने घेण्यात आले. २९१३ घरांमध्ये डासअळी आढळून आली. १,८९,९७७ पाणीसाठे तपासले. पैकी ७२१२ पाणीसाठे दूषित आढळले. पाच हजार पाणीसाठे रिकामे करण्यात आले. २६२ ठिकाणी गप्पीमासे सोडले. १९७६ ठिकाणी टॅमिफॉस टाकल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.