अमरावती - तीन दिवसांपूर्वी चार ते पाच वर्षीय दोन चिमुकलींना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय असल्याने त्या दोघींना यवतमाळ व तेथून नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील कावळे कुटुंबातील चार ते सहा वर्षीय दोन सख्ख्या बहिणींना ताप आला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर ताप कमी न झाल्यामुळे यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिला़ यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन्ही चिमुकलींना प्रखर ताप, डोके व हातपायात वेदना, गळा दुखणे ही लक्षणे वाढतच गेल्याने नागपूर येथे हलविण्यात आले आहे़ याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम यांनी तळेगावला भेट दिली असून, आरोग्य विभागास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभाग सतर्क प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया वैद्यकीय चमूने या भागातील ताप येणे, गळा दुखणे, अशक्तपणा येणे, थंडी लागणे असा रुग्णांवर अधिक लक्ष देणे सुरू केले असून, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे़
सदर प्रभागाकडे आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असून, दोन्ही चिमुकलींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर आजाराची माहिती मिळणार आहे़- अशोक लांडगे,वैद्यकीय अधिकारी, तळेगाव दशासर