लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डेंग्यूने उच्छाद घातला असताना, आरोग्य प्रशासनाला त्याच्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश की बाधित, हा घोळ घालून महापालिकेने आजपर्यंत उपाययोजनाच केल्या नाहीत. एप्रिलपासून ओरड होत असताना अहवालाच्या प्रतीक्षेतच महापालिका कालपव्यय केला. इतक्या गंभीर विषयात अहवाल प्राप्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही.जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल झालेल्या १७६ डेंग्यूसदृश रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आता तीन महिने ओलांडून गेलेत; मात्र अद्याप एकाही रुग्णाचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला नाही वा त्याबाबत प्रयत्नदेखील झाले नाहीत. यादरम्यान अनेक रुग्ण गंभीर अवस्थेला पोहोचले. खासगी उपचाराने बरेही झाले. हे रुग्ण डेंग्यूबाधित होते व अजूनही काही डेंग्यूबाधितांवर उपचार सुरूच असण्यावर खासगी डॉक्टर ठाम आहेत. महापालिका मात्र प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा करीत उपाययोजनांकडे मुद्दामच दुर्लक्ष करीत आली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालावर जर आरोग्य विभागाची धुरा असेल, तर जिल्हावासीयांनी आरोग्यविषयक न्याय मागावा तरी कुणाला, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.नागरिकांंच्या भावनेशी खेळअहवालाची प्रतीक्षा करीत जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, डास निर्मूलनाच्या उपाययोजनांचा केवळ देखावाच केला गेला. जिल्ह्याभरात डासांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. विषाणुजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी तुंबली आहेत. काही रुग्णांचे तर जीवसुद्धा गेले असावेत. मात्र, जिल्हा प्रशासनाला नागरिकांच्या जिवाचे मोलच नसल्याची स्थिती आहे. नागरिकांच्या आरोग्यसेवेशी जुळलेल्या प्रत्येक बारीक-सारीक बाबींवर उपाययोजना करण्यासाठी शासनाने अधिकारी नेमले आहेत. नागरिकांच्या पैशातूनच या शासकीय अधिकाºयांना वेतन दिले जाते. मात्र, त्याच नागरिकांच्या जिवाशी जिल्हा प्रशासन खेळ खेळत असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात निर्माण झाले आहे. अशा गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून तत्काळ उपाययोजना करायला हव्यात, कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी, मात्र, तसे न होता, केवळ नागरिकांच्या भावनांशीच खेळ खेळला जात आहे. ही शोकांतिका अमरावती जिल्ह्याची आहे.खासगी डॉक्टरांनाच नोटीसशहरातील काही खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या रुग्णालयातील रुग्णांचे रक्तजल नमुने महापालिकेच्या यंत्रणेमार्फत यवतमाळातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. खासगी रुग्णालयातील ही आकडेवारी मोठी आहे. मात्र, या आकडेवारीवर आक्षेप घेऊन महापालिकेचा आरोग्य विभाग खासगी रुग्णालयांला नोटीस पाठवून जाब विचारत आहे.पार्वतीनगर, रविनगर, महाविरनगर, चक्रधरनगरातील रुग्णांचे रक्तजल नमुने महापालिकेमार्फत शासकीय प्रयोगशाळेत पाठविले. मात्र, अद्याप अहवाल आला नाही.- अजय डफळे, एमडी, मेडिसीन. डफळे हॉस्पिटलया महिन्यात सात ते आठ रुग्ण आलेत, त्यांची एनएस १ एलायझा टेस्ट पॉझिटिव्ह आली. कन्फर्म रिपोर्टसाठी महापालिकेला रक्तजल नमुने पाठविले आहे.- स्वप्निल दुधाट, कन्सलटिंग फिजीशियन, गेट लाईफ हॉस्पिटलडेंग्यूचा एक रुग्ण उपचारानंतर बरा झाला. डेंग्यू रुग्णांवर सपोर्टींग मॅनेजमेंटनुसार उपचार करण्यात येते. प्लेटलेट कमी होणे, हे डेंग्यूच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. निदानासाठी चाचणी उपयुक्त आहे.- पंकज बागडे, फिजीशियनमहापालिकेकडून प्राप्त रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेन्टीनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येते. आठ ते दहा दिवसांत अहवाल अपेक्षीत आहे.- सुरेश तरोडेकर, जिल्हा हिवताप, अधिकारीग्रामीण भागात अद्यापही डेंग्यू रुग्णांची नोंद झालेली नाही. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता साथरोग व इतर आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.- सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.
डेंग्यू : उपाययोजनेत दिरंगाई का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:24 PM
शहरात डेंग्यूने उच्छाद घातला असताना, आरोग्य प्रशासनाला त्याच्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश की बाधित, हा घोळ घालून महापालिकेने आजपर्यंत उपाययोजनाच केल्या नाहीत. एप्रिलपासून ओरड होत असताना अहवालाच्या प्रतीक्षेतच महापालिका कालपव्यय केला. इतक्या गंभीर विषयात अहवाल प्राप्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही.
ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा? : अमरावतीकर डासमुक्तीच्या प्रतीक्षेत