शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दाट पांढरेशुभ्र धुके, क्षणात काळेकुट्ट ढग, धो धो कोसळणारे धबधबे आणि हिरवा गालिचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 11:19 AM

चिखलदरा पर्यटनस्थळावरील भीमकुंडसह इतरही आकर्षित करणारे धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार या वीकएंडसह अद्यापही पावसाचा अंदाज घेत शेकडो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत.

ठळक मुद्देचिखलदऱ्यात धबधबे कोसळू लागलेफेसाळणाऱ्या धबधब्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारापर्यटकांची गर्दी, २४ तासांत १०२ मिलिमीटर पाऊस

नरेंद्र जावरे 

लोकमत न्यूज नेटवर्क  

चिखलदरा : पर्यटनस्थळावर सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मंगळवारपर्यंत एकूण ३३३ मिमी पाऊस कोसळला. पर्यटनस्थळावरील भीमकुंडसह इतरही आकर्षित करणारे धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार या वीकएंडसह अद्यापही पावसाचा अंदाज घेत शेकडो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत.

विदर्भातील एकमेव पर्यटनस्थळ चिखलदऱ्यात पावसाळ्याच्या दिवसात पर्यटनोत्सवच असतो. पाऊस झेलत डोंगराच्या कडांवरून फेसाळणाऱ्या धबधब्याचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा राहतो. त्यामुळे शनिवार ते सोमवारी या तीन दिवसांत सहा हजारावर पर्यटकांनी येथे भेट दिली. त्यामधून लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न चिखलदरा नगरपालिकेला पर्यटनकराच्या रूपाने मिळाले.

यंदा पहिल्यांदा अतिवृष्टी

पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीसारखा धो-धो कोसळणारा पाऊस, तर कधी अंगावर मोरपीस फिरावे तसा तुषार असतो. दाट पांढरेशुभ्र धुके, क्षणात काळेकुट्ट ढग, धोधो, कोसळणारे धबधबे, हिरवा गालिचा पांघरलेले उंच गगनचुंबी पहाड असा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी करीत असतानाच रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या वेळेत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद अप्पर प्लेटो येथील पाटबंधारे विभागाच्या जलमापन केंद्रावर झाली. यंदा आतापर्यंत हा सर्वाधिक पाऊस आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंत एकूण ३३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा