आरोप : पांडुरंग ढोले यांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन, राज्यात ३६ लाख कृषिपंपचांदूररेल्वे : महाराष्ट्रात १३ वर्षांत शेतकऱ्यांच्या नावावर ६४०० कोटी ऊर्जा खात्याने शासनाकडून अनुदान उचलले. त्याची समिती नेमून त्वरित चौकशी करावी, अशी मागणी राज्य जनता दलाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रात ३६ लाख कृषीपंप आहेत. त्यातील गावनिहाय किती शेतकऱ्यांकडे विद्युत प्रवाह चालू आहे व किती शेतकऱ्यांकडे बंद आहे याची तपशीलवार माहिती विद्युत विभागाकडे नाही. ३६ लाख पंपांपैकी ४० टक्के विद्युतपंप बंद स्थितीत आहेत. परंतु वीज मंडळाने सर्व विद्युतपंप पूर्ववत सुरु आहे. याची आकडेवारी राज्य विद्युत मंडळाने दाखवून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे विद्युत बिलावरील अनुदान तेरा वर्षापासून ६५०० कोटी रुपयांची उचल केली. विद्युत मंडळातील वाढता भ्रष्टाचार, विद्युत मंडळातील ठेकेदारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची साठगाठ असूनही सरकारी अनुदानाची उचल करुन वीज मंडळ कसे नाफ्यात आहे. याची प्रसिध्दी करण्यात येते. शेतकऱ्याचे शेतीवरील विद्युत मिटरची आजपर्यंत प्रत्यक्ष किती युनिट आहे याचे मोजमाप करण्यासाठी एजंसी नाही आणि संबंधित तालुका पातळीवर नेमून दिलेले कर्मचारी संगणकावर बसून अंदाजे देयके शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे वापरल्यापेक्षा अधिक युनिटचा आकडा दर्शविले जातात.
शेतकऱ्यांच्या नावावरील अनुदान ऊर्जा खात्याने उचलले
By admin | Published: April 05, 2015 12:32 AM