चांदूर रेल्वे: वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी व युवा आघाडी यांनी सोमवारी (ता.२१)स्थानिक तहसिल कार्यालय समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा व त्यामुळे वाढलेल्या महागाईचा निषेध केला आहे.तसेच केंद्र व राज्य सरकारने महागाई कमी करून महागाईच्या आगीत होरपळलेल्या जनतेला त्वरीत दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रपती,प्रधानमंत्री,राज्यपाल व मुख्यमंत्री यांना चांदूर रेल्वे तहसिलदार मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड,जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे,बेबीनंदा लांडगे,वसंत मेंढे,उत्तमराव वासनिक,रवींद्र वाहणे,गजानन मोहोड,प्रेमचंद अंबादे,प्रा.सतिश वानखडे,जयंत गेडाम,तुळशीराम धारकर,अनिल इंगोले,हिरू मेंढे,अनिता धवणे,उषा मेश्राम,सविता फुलझेले,नंदा नन्नावरे,लता मोटघरे,दीपक बांबोडे,मिना रामटेके,प्रशांत चेंडकापुर,नागसेन गेडाम,विष्णु रंगारी,नंदू घोडेस्वार,अनिता श्रीरामे,दिनेश गजभिये, सुनिल मेश्राम,जगदीश गंधे,नितीन रामटेके,अशोक मते,ललिता खडसे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
220621\img-20210622-wa0004.jpg
===Caption===
photo