लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील विहिगाव येथे २२० केव्हीचे व धारणी तालुक्यात १३२ केव्हीचे विद्युत उपकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण गुरुवारी विहिगाव येथील प्रांगणात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोेटे होते. आमदार रमेश बुदिंले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, जिल्हा परिषद सदस्य विजय काळमेघ, प्रवीण तायडे, पंचायत समिती सभापती प्रियंका दाळू, नितीन पटेल, मनोहर माहुरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दाळू, शहर अध्यक्ष मुन्ना पटेल विहिगावच्या सरपंच अरुणा अभ्यंकर, धारणी तालुक्यातील झापल गटग्रामपंचायतीचे सरपंच रुपचंद्र भिलावेकर उपस्थित होते.यावेळी याच ठिकाणावरून धारणी उपकेंद्राचे विहिगाव येथूनच ई-लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे व आमदार रमेश बुदिंले, आ. प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रयत्नातून सदर कामे ऊर्जामंत्र्यांनी मंजूर केली होती. या दोन्ही तालुक्यांतील गावांना उपकेंद्र मिळाल्याने ग्राहकांना उच्च दाबाने विद्युत पुरवठा मिळणार आहे.यावेळी महापारेषणचे संचालक (संचलन) गणपत मुंडे, महावितरणचे कार्यकारी संचालक खंडाईत, महापारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, अधीक्षक अभियंता प्रफुल्ल अवघड, अविनाश शिंदे, गोविंद जाधव, अकोल्याचे अधीक्षक अभियंता सुधीर ढवळे, रुपेश फरकाडे, एसडीओ प्रियंका आंबेकर, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांचीही उपस्थिती होती.
अंजनगावात २२० केव्हीच्या उपकेंद्राचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:04 PM
तालुक्यातील विहिगाव येथे २२० केव्हीचे व धारणी तालुक्यात १३२ केव्हीचे विद्युत उपकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण गुरुवारी विहिगाव येथील प्रांगणात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती : धारणीत १३२ केव्हीच्या उपकेंद्राचे ई-लोकार्पण