लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हीन दर्जाचे भाष्य करून धक्काबुक्की करणारे बेजबाबदार ठाणेदार मनीष ठाकरे यांची उचलबांगडी करा, अन्यथा भीम आर्मी आपल्या स्टाईलने आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला. त्यापार्श्वभूमिवर सीपींनी या प्रकरणाची चौकशी उपायुक शशिकांत सातव यांच्याकडे सोपविली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठकी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीम आर्मीचे प्रदेश सचिव मनीष साठे, अमरावती जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर उपप्रमुख प्रवीण बनसोड व हेमंत कोडापे १५४ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्दाचे निवेदन देणार होते. दरम्यान गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी प्रवेशद्वारासमोरच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांशी हीन दर्जाचे भाष्य करीत तुच्छ वागणूक दिली आणि शिवीगाळ व लोटलाट करून खोटे गुन्हे नोंदविले. अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची तत्काळ उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात अटॅच करा, आमच्या तक्रारीवरून ठाणेदार ठाकरेंविरुद्ध गुन्हे दाखल करा, अन्यथा भीम आर्मी संघटनेच्यावतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तांकडे दिले.गाडगेनगर हद्दीतील अवैध धंद्यांचा पर्दाफाश करूभीम आर्मीच्या लेखी तक्रारीवरून जर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर कार्यकर्ते पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसेल. याशिवाय गाडगेनगर हद्दीतील अवैध धंदे तत्काळ बंद करा, अन्यथा संपूर्ण अवैध धंद्यांची रेकॉडिंग काढून पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येईल, असा इशाराही भीम आर्मीने पोलीस आयुक्तांना दिला आहे.डीसीपी सातव करणार चौकशीभीम आर्मी कार्यकर्त्यांच्या निवेदनानंतर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याप्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडे सोपविली.भीमआर्मीच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार प्राप्त झाली. शहानिशा करून त्यातील वस्तुस्थिती शोधून काढण्याची जबाबदारी उपायुक्तांकडे दिली आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त
उपायुक्त सातव करणार मनीष ठाकरेंची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 9:53 PM
हीन दर्जाचे भाष्य करून धक्काबुक्की करणारे बेजबाबदार ठाणेदार मनीष ठाकरे यांची उचलबांगडी करा, अन्यथा भीम आर्मी आपल्या स्टाईलने आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना निवेदनातून दिला.
ठळक मुद्देउचलबांगडी करा : भीम आर्मीचा सीपींना इशारा, अन्यथा आक्रमक आंदोलन