आयुक्तांचे आदेश : प्रशासकीय वर्तुळात खळबळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मनपाच्या कार्यकारी अभियंता-२ कार्यालयात कार्यरत उपअभियंता रवींद्र पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी हे आदेश जारी केले. त्यांचा प्रभार उपअभियंता सुहास चव्हाण यांचेकडे सोपविण्यात आला आहे.२४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यक विभागाच्या प्रधान सचिवांची सभा होती. सभेला उपस्थित राहण्याबद्दल उपअभियंता पवार यांना आयुक्तांनी तसेच उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सूचित केले होते. मात्र, पवार यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रधान सचिवांना कार्यकारी अभियंता-२ विभागाशी संबंधित माहिती पुरविता आली नाही. यामुळे मनपाची प्रतिमा मलिन झाली. वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले असून त्यांचे मुख्यालय उत्तर झोन क्र. १ असेल.उमेश फतवाणींची वेतनवाढ थांबविलीलेखा विभागातील कनिष्ठ लिपिक उमेश फतवाणी यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी थांबविण्यात आली असून या आदेशाची त्यांच्या सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. फतवाणी यांनी हेतुपुरस्सरपणे हजेरी पुस्तिकेवर पुढील तारखेची स्वाक्षरी केली. अशाप्रकारे त्यांनी यापूर्वीही हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. याबाबत खुलासाही मागविण्यात आला. खुलाशानंतर फतवाणी यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी थांबविण्यात आली आहे. गहरवार कार्यमुक्त२८ फेब्रुवारीच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंता म्हणून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या विजयसिंग गहरवार यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आयुक्तांची परवानगी न घेता मुख्यालय सोडल्याचा ठपका त्यांचेवर आहे. त्याअनुषंगाने महापालिकेतील त्यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशान्वये गहरवार १० मार्च रोजी कार्यकारी अभियंता-२ पदी रूजू झाले होते. कारवाईनंतर त्यांचा तात्पुरता प्रभार अनंत पोतदार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उपअभियंता रवींद्र पवार निलंबित
By admin | Published: June 28, 2017 12:13 AM