आसिफ लेंड्यासह चौधरी अटकेत : ५ कोटी २८ लाखांच्या खंडणीची मागणीअमरावती : जमीन नावे करणे तसेच ५ कोटी २८ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या उपमहापौर शेख जफरने बापलेकांना पाच तास घरात डांबून ठेवल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी शेख जफरचा सहकारी आसिफ लेंड्यासह अफजल चौधरीला अटक करून चौकशी सुरु केली आहे. कॅम्प येथील रहिवासी प्रशांत हेमंतकुमार व्यास यांचा प्रापर्टीचा व्यवसाय असून त्यांचे व हेमंत प्रवीणचंद खत्री यांच्यात शहरातील एका संपत्तीचा वाद सुरु आहे. व्यास यांची संपत्ती नावे करून घेण्यासाठी उपमहापौर शेख जफरने महिनाभरापासून तगादा लावला. संपत्ती नावे करून द्या तसेच आणखी ५ कोटी २८ लाख रुपयांची मागणी शेख जफरने केली. या मागणीच्या उद्देशाने शेख जफरचे सहकारी आसिफ लेंड्या व देवा हे दोघेही १३ जुलै रोजी हेमंत व्यास यांच्या प्रतिष्ठानात गेले होते. मात्र, त्यावेळी हेमंत व्यास यांचा मुलगा प्रशांत व्यास प्रतिष्ठानात उपस्थित होता. त्यामुळे त्यांनी प्रशांतला धमक्या देत शेख जफरच्या घरी नेले होते. यावेळी शेख जफरने प्रशांतला धमक्या देत खत्रीचे ‘मॅटर’ निपटविण्याची तंबी दिली. मात्र, प्रशांतने काही दिवसांची अवधी मागितला होता. त्यानंतर शेख जफरने महिनाभराची प्रशांतला मुदत दिली. एक महिना ओलांडल्यावर १३ आॅगस्ट रोजी शेख जफरचे काही सहकारी हेमंत व्यास यांच्याकडे गेले. त्यांना व त्यांचा मुलगा प्रशांतला दमदाटी करीत शेख जफरच्या घरी नेले. शेख जफरने बापलेकांना जीवे मारण्याच्या धमक्या देत घरातच पाच तास डांबून ठेवले. त्यानंतर शेख जफरने व्यास यांना पुन्हा दोन दिवसांची मुदत देऊन कागदपत्रे व पैसे तयार ठेवण्याचे सांगितले होते.तडीपार, तरीही शहरातच ! उपमहापौर आरोपी शेख जफर याला न्यायालयाच्या आदेशाने दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. तरीदेखील शेख जफर अमरावती शहरात फिरताना आढळून आला आहे. हे कृत्य शेख जफरने घरी बसूनच केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलीस यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.शेख जफरच्या घराची झडतीशुक्रवारी शेख जफरविरूध्द गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. मात्र शेख जफर घरी नव्हता. शेख जफर घरापासून काही अंतरावर उभा असल्याचे पोलिसांना दिसून आला. ताब्यात घेण्यापूर्वी शेख जफर पसार झाल्याची माहिती आहे. खत्री व व्यास यांच्यात संपत्तीचा वाद अनेक दिवसांपासून सुरु होता. दोघांनीही पूर्वी एकमेकांविरूध्द तक्रारी दिल्या आहेत. शनिवारी शेख जफरविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल होताच आसिफ लेंड्या या आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. - सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त,
उपमहापौर शेख जफरने बापलेकांना पाच तास डांबले
By admin | Published: August 23, 2015 12:24 AM