लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील गुगामल वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षकांनी आपणास शिवीगाळ करीत मारहाण केल्याची फिर्याद तेथे कार्यरत दिव्यांग शिपाई धर्मेंद्र रामजी बेठेकर यांनी रविवारी रात्री परतवाडा पोलिसांत दाखल केली. यामुळे व्याघ्र प्रकल्पात एकच खळबळ उडाली आहे.विनोद शिवकुमार असे आरोपी उपवनसंरक्षकाचे नाव आहे. तक्रारकर्ता धर्मेंद्र बेठेकर हा उपवनसंरक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर शिपाई म्हणून तैनात आहे. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास चोरट्यांनी या निवासस्थानातील पन्नास वर्षे जुने चंदनाचे झाड कापून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. रात्रपाळीतील चौकीदार शे. करीम याची चोरट्यांशी झटापट झाली. या आवाजाने परिसरातील खासगी दुकानाचा चौकीदार चेतन यादव आला असता, त्याच्याकरवी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी मला घरून बोलावले आणि पोहोचताच मारहाण करीत शिवीगाळ केली. बाहेर जाऊन पुन्हा आले व काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. शे. करीमने उपवनसंरक्षकांच्या हातातील काठी हिसकल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत धर्मेंद्र बेठेकर यांनी नमूद केले. परतवाडा पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.व्याघ्र प्रकल्पात खळबळकाही आदिवासी संघटनांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेठी यांच्याविरोधात अकोट वन्यजीव विभागातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असताना, गुगामल वन्यजीव विभागातील सदर प्रकरणाने वन आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली आहे.उपवनसंरक्षकांनी शिवीगाळ व मारहाण केली. आपण दिव्यांग असून, आदिवासी आहोत. अन्यायाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.धर्मेंद्र बेठेकर, शिपाई, गुगामल वन्यजीव विभाग
सदर कर्मचारी सतत अनुपस्थित होता. त्याला त्याबद्दल विचारणा केली आणि असेच गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. मारहाणीचा आरोप खोटा आहे.विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग परतवाडासदर प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधितांचे बयाण घेतले जात आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.संजय सोळंकेठाणेदार, परतवाडा