- गणेश वासनिकअमरावती - वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पहिल्यांदाच मार्चमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याने वाघांची तहान भागविणे वनविभागासाठी जिकरीचे झाले आहे.राज्यात सहापैकी ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. तेथे आजमितीला १७० ते १७५ वाघ आहेत. यंदा उन्हाळा तीव्र असेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्यानंतर व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे काम सुरू आहे. जंगलात साधारणपणे १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत.काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाणार आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. उन्हाची धग वाढत असताना काही जंगलांमध्ये वणवा लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजिवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कोणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाºयांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो.वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, यादृष्टीने जंगलांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेतव्याघ्र प्रकल्प अधिकाºयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाºयांवरही आम्ही लक्ष ठेऊन आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर
तहानलेल्या वाघांची पाण्यासाठी वणवण, वनविभागाकडून उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:40 AM