चेतन घोगरे ।आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : सण-उत्सव तसेच आपत्कालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पाच कोटींपैकी चार कोटींची बक्षिसे त्वरित वाटप करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या आदेशावरून कार्यवाहीला अद्याप गती मिळालेली नाही.राज्यात २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सण-उत्सव होते. आॅगस्ट महिन्यात मुंबई व परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी पोलिसांनी वित्तहानी व जीवहानी होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या कामगिरीकरिता पाच कोटी रुपये बक्षीस वितरीत करण्यास राज्याच्या गृहविभागाने मान्यता दिली होती. या अनुषंगाने पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बल गट १ ते १६ यांना उपलेखाशीर्ष बक्षीस उद्दिष्टाखाली म्हणून चार कोटी रुपये बीडीएस प्रणालीवर उपलब्ध केले.रकमेचे वाटप केव्हा ?गृह विभागाने चार कोटी रुपये मंजूर केले तसेच अपर पोलीस महासंचालकांनी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना ही बक्षीस स्वरूपाची रक्कम दोन महिन्यांपूर्वी त्वरित उपलब्ध करून दिली. तरीही रक्कम वाटपात पोलीस विभागाकडूनच दिरंगाई होताना दिसून येत आहे.मुंबई आयुक्तालयास सर्वाधिक निधीअमरावती आयुक्त कार्यालयाला सर्वात कमी ५,२१,३१७ रुपये निधी, तर पुणे आयुक्त कार्यालयाला सर्वाधिक २,७५,०४,७३१ रुपये निधी प्राप्त झाला. गट क्र.८ मुंबईला सर्वाधिक ३,३१,०८४, तर गट क्र.१६ कोल्हापूरला २,०३,१४० रुपये निधी प्राप्त झाला.पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्रनिहाय निधीवाटपठाणे परिक्षेत्र २,८२,५,१५७नाशिक परिक्षेत्र ३,६७,१,९४६कोल्हापुर परिक्षेत्र ३,९६,५,७१३औरंगाबाद परिक्षेत्र २,१५,२,६०७अमरावती परिक्षेत्र ३,३०,०,५१०नांदेड परिक्षेत्र २,३१,०,५७३नागपूर परिक्षेत्र ४,४३,७,६४८(सर्व आकडे रुपयांत)
पोलिसांच्या बक्षिसात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:57 PM
चेतन घोगरे ।आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : सण-उत्सव तसेच आपत्कालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पाच कोटींपैकी चार कोटींची बक्षिसे त्वरित वाटप करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या आदेशावरून कार्यवाहीला अद्याप गती मिळालेली नाही.राज्यात २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सण-उत्सव होते. आॅगस्ट महिन्यात मुंबई व ...
ठळक मुद्देचार कोटी मंजूर : राज्य शासनाचा निर्णय, अमरावती आयुक्त कार्यालयाला सर्वांत कमी निधी