शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आग्र्याच्या तरूणाकडून देशी कट्टा जप्त; ११ जिवंत काडतुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 9:38 PM

Amravati News नांदगाव पेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेल्या आरोपीकडून देशी कट्टा व ११ जिवंत काडतूस जप्त केले.

प्रदीप भाकरे अमरावती: नांदगाव पेठ पोलिसांनी उत्तरप्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेल्या आरोपीकडून देशी कट्टा व ११ जिवंत काडतूस जप्त केले. शिवपार्वतीनगर परिसरात ६ एप्रिल रोजी दुपारी ४.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. श्रीपती भजनलाल (४०, रा. टिनका नगला, धारूपुरा, आग्रा उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.

नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपार्वतीनगर भागात एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असून त्याच्याकडे देशी कट्टा असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण काळे यांना मिळाली. ती माहिती डीसीपी व एसीपींना देत काळे यांनी त्या भागात ट्रॅप लावला. त्यावेळी एक इसम संशयितरित्या फिरतांना मिळून आला. संशयावरून त्याच्या ताब्यातील काळया रंगाच्या बॅगेची पाहणी केली असता त्यात एक देशी कटटा व ११ जिवंत काडतूस असा १२ हजार २०० रुपयांचा ऐवज दिसून आला. तो देशी कट्टा व काडतुसे विनापरवाना मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आले. आरोपीला अटक करून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण काळे, पोलीस निरिक्षक हणमंत डोपेवाड, हवालदार संजय खारोडे, संजय नेहारे, वैभव यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी