निर्णयाची प्रतीक्षा : समितीच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे. यासाठी शासनाने सहकार विभागाकडे मार्च अखेरीस ५० ते दोन लाखांपर्यंतच्या थकीत रकमांचे विवरण मागविले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंर्दभात शासन समितीची सोमवारी बैठक होत आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर कोणता तोडगा निघतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद देत शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली. शासन व सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्च्चेत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. त्यानंतर लगेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी थकीत शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.याविषयी सर्व बँकाना निर्देश देण्यात आले असले तरी अद्याप एकाही बँकेव्दारा एकाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले नाहीत.जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकरीजिल्हा बँकेचे ३२,६४३ शेतकऱ्यांकडे ५० हजारांच्या मर्यादेत २५०.९४ कोटी, २२,४४३ शेतकऱ्यांकडे एक लाखांच्या मर्यादेत १६७.३ कोटी,व ९,४४७ शेतकऱ्यांकडे दीड लाखांच्या मर्यादेत १५३.४५ कोटींचे कर्ज थकीत आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांचे ५० हजार रूपयांच्या कर्जमर्यादेत ९७,६६५ शेतकऱ्यांकडे ७६४.६८ कोटी, एक लाखाच्या मर्यादेत ५०,४१५ शेतकऱ्यांचे ३९५.५२ कोटी,व दीड लाखांच्या मर्यादेत २०,२०६ शेतकऱ्यांकडे १५८.२१ कोटींचे कर्ज थकीत आहेत.ग्रामीण बँकाकडे ५० हजारांच्या मर्यादेत १२५६ शेतकऱ्यांकडे ०.७ कोटी, एक लाखांच्या कर्जमर्यादेत २० शेतकऱ्यांकडे ०.१४ कोटी, व दीड लाखांच्या कर्जमर्यादेत ०.५ कोटी रूपये थकीत आहे.
दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाचे मागविले विवरण
By admin | Published: June 20, 2017 12:06 AM