लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिलांवरील अत्याचार व एकतर्फी प्रेमातून त्यांना जाळून मारण्याच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. सोबतच समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्यास भाग पाडले पाहिजे, असा ठाम निर्धार ‘हुंकार जळीत मनाचा’ या चर्चासत्रात उपस्थितांकडून करण्यात आला.महिलांनी विशेषत: विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत तसेच अन्याय सहन करू नये. हा लढा निरंतरपणे पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार या चर्चासत्रात उपस्थिती स्त्रीशक्तीने केला.लक्ष्य प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या पुढाकारातून येथील अभियंता भवनात बुधवारी चर्चासत्र झाले. व्यासपीठावर पत्रकार सरिता कौशिक होत्या. सुरेखा ठाकरे, पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, अंबादास मोहिते, वर्षा देशमुख, डॉ. प्रांजली शर्मा, विक्रम वानखडे, मयूरा देशमुख, महावीर धूळधर, शोभना देशमुख, अंजली ठाकरे, कांचनमाला गावंडे, संतोष महात्मे आदी उपस्थित होते. मुली, महिलांवर होणाºया अन्याय-अत्याचाराविरोधात आता समाजानेच पेटून उठले पाहिजे. नराधमांना कठोर शिक्षा, मुली, महिलांची सुरक्षितता, सोशल मीडियाचा वापर, महिलाविषयक दृष्टिकोन अशा विविध मुद्द्यांवर चर्चासत्रात मंथन करण्यात आले. प्रास्ताविकात महिलांचे प्रश्न शासनदरबारी लावून धरणार असल्याचे सुरेखा ठाकरे म्हणाल्या. संचालन व आभार मेघश्याम करडे यांनी केले. कार्यक्रमाला सुषमा बर्वे, अर्चना सवाई, माधुरी ढवळे, ज्योती बोकडे, सुषमा बिसने, ज्योती वानखडे, कल्पना बुरंगे, आशा धवने, वैशाली कोंडागडे, दामिनी श्रीखंडे, मनाली तायडे, सरला इंगळे उपस्थित होत्या.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी तीव्र लढ्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 1:40 AM
महिलांवरील अत्याचार व एकतर्फी प्रेमातून त्यांना जाळून मारण्याच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. सोबतच समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्यास भाग पाडले पाहिजे, असा ठाम निर्धार ‘हुंकार जळीत मनाचा’ या चर्चासत्रात उपस्थितांकडून करण्यात आला.
ठळक मुद्देस्त्रीशक्ती एकवटली : ‘हुंकार जळीत मनाचा’ चर्चासत्रील सूर