तीन रस्त्यांचा समावेश : ३० कि.मी. लांबीसाठी दोन कोटी ६५ लाखलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. त्यामुळे पर्यटक देखील हैराण झाले आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चिखलदरा तालुक्यांतील रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. ३० कि.मी. लांबीच्या रस्ते निर्मितीसाठी दोन कोटी ६५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.राज्याच्या ग्रामविकास विभागाने १६ मे रोजी शासन आदेशान्वये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सन २०१६-१७ यावित्तीय वर्षात भाग-२ अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात चिखलदरा तालुक्यातील तीन रस्त्यांचा समावेश आहे. ३०.४ कि.मी. लांबीच्या रस्ते निर्मितीसाठी दोन कोटी ६५ लाख रूपयांची अंदाजित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तसेच यारस्त्यांच्या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरूस्तीची अंदाजित रक्कम १ कोटी ८५ लाख रूपये ठरविण्यात आली आहे. यारस्त्यांची निर्मिती करताना ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर व ग्रामविकास विभागाच्या अटी, शर्तींवर कार्यान्वित करण्याचे बंधनकारक केले आहे. प्रत्येक रस्त्याला तांत्रिक मान्यता घ्यावी लागेल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांनी रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करूनच कार्यारंभ आदेश द्यावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. तांत्रिक मान्यता प्रदान करण्यापूर्वी रस्त्याचा वाव काटेकोरपणे तपासून संकल्पन निश्चित करण्याची अट आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चिखलदऱ्यात रस्त्यांचा विकास
By admin | Published: May 18, 2017 12:22 AM