लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पेढी नदीवरील निर्वाणस्थळाचा ३८ कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्यातून कायापालट करण्यात येत आहे. तेथे अनेक विकासकामे प्रगतिपथावर आहेत. मूलभूत सुविधा निर्माण झाल्याने भाविक व पर्यटकांची पावले निर्वाणभूमीकडे वळली आहेत असा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने येथील मूलभूत सुविधांकरिता ३८ कोटींचा आराखडा मंजूर करून तातडीने निधीसुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळेच या परिसाराचा कायपालट होत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. निर्वाणस्थळाचा विकास, बसस्थानक, अंतर्गत रस्ते, घाटाचे बांधकाम, पूरप्रतिबंधक भिंत, उद्यान, वृद्धाश्रमातील खोल्यांची दुरुस्ती, भक्तनिवास, ध्यान केंद्र, पाणी योजना, स्मशानभूमी बांधकाम आदी विकासकामांचा त्यात समावेश आहे. सद्यस्थितीत काही विकासकामे पूर्ण झाली असून, उर्वरित प्रगतिपथावर आहेत. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पवित्र निर्वाणस्थळी त्यांच्या भक्त तथा अनुयायांची गैरसोय होत होती. त्यामुळेच हा विषय सातत्याने लावून धरल्यामुळे आता संत गाडगेबाबांच्या निर्वाणभूमीचा चेहरामोहरा बदललेला असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या.बसस्थानकाची प्रशस्त इमारत होणारअमरावती ते परतवाडा मार्गातील वलगाव येथून चौरस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. प्रवाशांचीही संख्या मोठी राहते. मात्र, बस स्थानकात अपुरी जागा व तोकड्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे या बसस्थानकाचा विकास आराखड्यात समावेश करून घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच बस स्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करवून घेतले. आता लवकरच बसस्थानकाची ही प्रशस्त इमारत उभी राहणार असून, त्याचा लाभ असंख्य प्रवाशांना होणार आहे.
३८ कोटींच्या आराखड्यातील विकासकामे प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:00 AM
वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन काँग्रेस सरकारने येथील मूलभूत सुविधांकरिता ३८ कोटींचा आराखडा मंजूर करून तातडीने निधीसुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळेच या परिसाराचा कायपालट होत
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : संत गाडगेबाबांच्या निर्वाणभूमीमुळे भाविकांना सुविधा