अमरावती- निवडणूक काळात वचननाम्यात दिलेल्या शब्दांचे पालन करीत एका वर्षात तब्बल साडेअकरा कोटींची विकास कामे शहरात करण्यात आली असून आगामी चार वर्षांत हे शहर राज्यात विकासाच्या दृष्टिकोनातून अव्वलस्थानी राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पत्रपरिषदेत दिली़
धामणगाव नगरपरिषदेच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष अडसड म्हणाले, शहरात वैशिष्टपूर्ण निधीअंतर्गत राठीनगर, लुनावतनगर, भागचंदनगर, जिमखाना परिसर, कोठारी नगर, श्रीविहार कॉलनी, बोहरा कब्रस्थान, धवनेवाडी, श्रीकृष्णदास राठी नगर, तुळजाईनगर, भिकुजीनगर, सर्वोदयनगर यासह २० खुल्या जागांना कुंपण भिंत व सौंदर्यीकरण करण्यात आले असून पाच कोटींची विकासकामे गत एक वर्षात शहरात झाली आहेत.
तीन कोटींचे शहरात रस्तेरस्ता निधी विकास अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून रखडलेला शास्त्री चौक, धवणेवाडी या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. लुनावतनगर, शिवाजी वॉर्ड, स्वामी समर्थ मंदिर परिसर, सर्वोदय कॉलनी, साईमंदिर परिसर, राठीनगर हनुमान मंदिर परिसर या भागात नगरोत्थान विकास निधी अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत.
स्वच्छ शहराला पुढाकारच्स्वच्छ भारत अभियानांतर्गत या शहराने एक पाऊल पुढे टाकत शहरात तब्बल ७१० शौचालये बांधण्यात आले. भारत सरकारच्या स्वच्छ नगरपरिषद या स्पर्धेत धामणगाव नगर परिषदेने सहभाग घेतला होता़ आपल्या धामणगाव नगरीला अधिक स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी तसेच राष्ट्रीय स्तरावर या शहराची मान उंचाविण्याकरिता सर्व जनतेने आपला परिसर, घर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी केले आहे.