नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्रामपंचायतीवर रहिवासी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असताना लगतच्या देवमाळी ग्रामपंचायतीने मात्र नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविल्याचे चित्र आहे. दस्तुरखद्द ग्रामपंचायत कार्यालय पाण्यात गेल्यापासून जाण्यासही रस्ता नाही. परिसरातील अवस्था अत्यंत बिकट असल्याने प्रचंड संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. देवमाळी हे गाव पाच किलोमीटर क्षेत्रफळाचे. सहा हजारांवर लोकसंख्या. चार प्रभागात ११ सदस्य ग्रामपंचायतीची धुरा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीच निवडून दिले आहेत. कार्यालयासह परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या प्लॉटवर पाण्याचे तलाव साचले आहे. संततधार पावसामुळे त्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातून रोगराईला जन्म देण्याचे काम दस्तुरखुद्द ग्रामपंचायत करीत असल्याचे चित्र आहे. सुशिक्षित रहिवासी नागरिकांची ग्रामपंचायत असली तरी ग्रामपंचायतीचा डोलारा मूलभूत सोयी-सविधा उपलब्ध करून देण्यात सदस्य थिटा पडले आहे. शुक्रवारच्या पावसामुळे घाणीच्या साम्राज्यात अजून भर पडली आहे. स्वच्छतेचा धडा गिरवणारी ग्रामपंचायत नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात ठेवत असल्याचे चित्र आहे.
अशी दिली माहितीग्रामपंचायतीच्या ढेपाळलेला कारभार आणि नागरिकांच्या जीविताचा सुरू असलेला खेळ यावर नागरिकांच्या मनात प्रचंड संताप आणि खदखद सुरू आहे. नोकरदार असल्याने तक्रार करण्यास त्यांच्या मनात भीती आहे. या सर्व बाबी पाहून त्यांनी लोकमत यासंदर्भात आपली व्यथा मांडली.
आजार हवा तर देवमाळीत चला!कोरोना नंतर प्रत्येक आजारासाठी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे आरोग्याची काळजी प्रत्येक जण घेत असताना देवमाळी ग्रामपंचायत मात्र नागरिकांच्या जीवशी खेळत असल्याचा प्रकार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, केदारनगर, रुक्मिणीनगर, बालाजीनगर, हनुमान नगर, चक्रधर सर्वच ठिकाणी तलाव साचले आहे. दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव डेंगू मलेरिया सर्दी खोकला, ताप या आजारांना निमंत्रण देणारा ठरला आहे.
सुज्ञ नागरिक अन् अज्ञानी ग्रामपंचायतसर्वाधिक सुज्ञ आणि नोकरदार वर्ग देवमाळी ग्रामपंचायतमध्ये रहिवासी असल्याने. सुज्ञ मतदार मतदान करतात. मात्र निवडून दिलेल्या सदस्य त्यांच्या जिवाचा खेळ अज्ञानी होऊन खेळत असल्याचा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतनारा ठरला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सहा नागरिकांच्या घरातही गढूळ पाण्याचा शिरकाव होत असताना निद्रिस्त ग्रामपंचायतीचा कारभार चर्चेचा विषय ठरला आहे.