धामणगावात भाजपामध्ये उमेदवारीसाठी चुरस; काँग्रेसचे आव्हान !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 09:24 PM2019-09-17T21:24:42+5:302019-09-17T21:27:03+5:30

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेतली होती.

dhamangaon constituency :Challenge of Congress! | धामणगावात भाजपामध्ये उमेदवारीसाठी चुरस; काँग्रेसचे आव्हान !

धामणगावात भाजपामध्ये उमेदवारीसाठी चुरस; काँग्रेसचे आव्हान !

Next

अमरावती : बहुतांश ग्रामीण भाग असलेला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात वीरेंद्र जगताप यांनी काँग्रेसकडून आमदारकीची ‘हॅट्ट्रिक’ केली आहे. जगताप हे आमदारकीसाठी चौथ्यांदा सामोरे जातील. भाजपने जगताप यांचा अश्वमेध रोखण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराचा शोध चालविला आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला पक्षातूनच विरोध होत असताना डॉ. नितीन धांडे यांनी दावेदारी स्पष्ट केल्याने येथे उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण अडसड यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेतली होती. परंतु, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांना मोदींची सभा हरवू शकली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांना पक्षाने विधान परिषदेचे सदस्यत्व बहाल केले.

आमदार असलेल्या अरुण अडसड यांनी आता त्यांचे चिरंजीव प्रताप यांना आमदारकीसाठी भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत; तथापि एकाच घरात दोन आमदार कसे, हा मुद्दा तापला आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी गाव-खेड्यात मेळावे, आरोग्य शिबिरे, महिला मेळावे, शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून डॉ. धांडे हे उमेदवारी चे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

या मतदारसंघात निस्ताने, डॉ. संदीप धवणे, प्रवीण घुईखेडकर, नीलेश विश्वकर्मा, अभिजित ढेपे, राजेश पाठक हे निवडणुकीची तयारी करीत आहेत. सेनेकडून बाळासाहेब भागवत यांनी उमेदवारी मागितली आहे. युती, आघाडी झाल्यास पर्याय म्हणून इच्छुकांनी वंचित बहुजन आघाडी, बसपा अथवा अपक्ष लढण्याची तयारी चालविली आहे. येथे देशमुख, मराठा, कुणबी या समाजाचे प्राबल्य
 

Web Title: dhamangaon constituency :Challenge of Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.