लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत धारणी पंचायत समितीने विजयाची परंपरा कायम राखत यावषीर्देखील जनरल चॅम्पियनशिप शिल्ड पटकाविले. याशिवाय, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियनशिपचेदेखील ' ते ' मानकरी ठरले. तब्बल २० वर्षांपासून धारणी जनरल चॅम्पियन शिल्डची विजेता मानकरी ठरत आहे.बक्षीस वितरण समारंभात धारणी पंचायत समितीच्या विजयी संघाला शिक्षण सभापती जयंत देशमुख यांच्या हस्ते जनरल चॅम्पियनशिप शील्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विजयी चमुने एकच जल्लोष केला?शिराळा येथे आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे शनिवारी बक्षीस वितरण सभापती जयंतराव देशमुख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सदस्या अल्का देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, जिल्हा परिषद गजानन राठोड, संगीता तायडे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज देशमुख, सरपंच सचिन देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी राम तुरणकर, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, देवेंद्र पेठकर, आताऊल्ला खान, पंडित पंडागळे, मिलिंद तायडे, भारत अवघड आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका निभावणारे राजू आमले, मुजाहिद्दीन, राजू भाकरे व प्रफ्फुल भोरे या शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी नितीन उंडे यांनी केले. संचालन शकील, रवींद्र यावले यांनी केले. आभार सुनील कुकडे यांनी मानले. अशी माहिती क्रीडा महोत्सवाचे प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर, विनायक लकडे यांनी दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे मानकरी प्रथम पंचायत समिती दयार्पूर, द्वितीय - पंचायत समिती. चिखलदरा तर प्रोत्साहनपर - वरुड पंचायत समिती यांचा समावेश आहे. निदर्शने प्रकारात प्रथम - चिखलदरा पंचायत समिती द्वितीय - मोर्शी पंचायत समिती प्रोत्साहन पर - शिराळा येथील चमुचा समावेश आहे.या आहेत विजयी चमूप्राथमिक विभागात कबड्डी मुले-शेंदूरजनाखुर्द (धामणगाव), मुली कबड्डी - सातेफळ (चांदूर रेल्वे), मुले खोखो - बिजूधावडी (धारणी), मुली खोखो-लोहोगाव (नांदगाव) लंगडी - उकूपाटी (धारणी) यांचा समावेश आहे.माध्यमिक विभागात कबड्डी मुले - पोहरा (धारणी), कबड्डी मुली - शिरजगाव मो.(तिवसा), खोखो मुले -मान्सुधावडी (धारणी), खोखो मुली- मान्सुधावड़ी (धारणी), व्हॉलीबॉल - खडका (वरुड), टेनिकवाईट एकेरी - चटवाबोड ( धारणी), टेनिकवाईट दुहेरी - चटवाबोड (धारणी), बॅडमिंटन एकेरी - शिरलस (मोर्शी), बॅडमिंटन दुहेरी - जावरा फ. (तिवसा) या शाळांचा समावेश आहे.
धारणी पंचायत समिती जनरल चॅम्पियन शिल्डची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 9:45 PM
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत धारणी पंचायत समितीने विजयाची परंपरा कायम राखत यावषीर्देखील जनरल चॅम्पियनशिप शिल्ड पटकाविले. याशिवाय, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियनशिपचेदेखील ' ते ' मानकरी ठरले. तब्बल २० वर्षांपासून धारणी जनरल चॅम्पियन शिल्डची विजेता मानकरी ठरत आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळा क्रीडा स्पर्धेचा समारोप : प्राथमिक व माध्यमिक प्रकारात बक्षीस वितरण