अमरावती : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे यांनी १४८० मतांची आघाडी घेतल्याची माहिती उमेदवाराच्या प्रतिनिधीने दिली. यामध्ये लिंगाडे यांना २३७९५ व भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांना २२३१५ मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आता तिसऱ्या फेरीला सुरूवात झालेली आहे. जोवर पहिल्या पसंतीची मतांची मोजणी पूर्ण होत नाही व अवैध मतांची संख्या निश्चित होऊन विजयी मतांचा कोटा ठरत नाही, त्यानंतर उमेदवार निहाय मते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.