धामणगाव रेल्वे : लायन्स क्लब, धामणगावतर्फे बापूराव बुटले स्मृतीप्रीत्यर्थ नि:शुल्क रोगनिदान, औषध वाटप शिबिर माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पुनसे, डॉ. जगदीश पाटील, डॉ. संतोष डोईफोडे, डॉ. दीपाली डुबे, प्रिया जैन यांनी नि:शुल्क सेवा दिली. याप्रसंगी २१० रुग्णांना औषध वाटप करण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे अनुदानित मधुमेह जनजागृती अभियानांतर्गत या शिबिरात येणाऱ्या रुग्णांची जेवणापूर्वी व जेवणानंतर आणि मध्यंतरी रक्तशर्करा चाचणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांनी केले. लायन्स क्लब चेअरपर्सन योगेंद्र कोपुलवार, झोन चेअरपर्सन विलास बुटले, डॉ. आगीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर चेतन कोठारी, सतीश बूब होते. कार्यक्रमाकरिता प्रकल्प निदेशक रमेश बेहरे गिरीश भुतडा, संजय सायरे, सचिन कुऱ्हेकर, जाधव व हेल्पिंग हँडच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.