शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
8
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
9
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
10
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

‘सुपर’मध्ये ८६१० रुग्णांचे डायलेसिस, तर सहा किडनी शस्त्रक्रिया

By उज्वल भालेकर | Published: April 05, 2023 6:15 PM

किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. 

अमरावती : किडनीचा आजार झाल्यास डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. परंतु हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाहीत; परंतु विभागीय संदर्भ रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे मागील ११ महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार, तर सहा रुग्णांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांचे प्राण वाचविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे जिल्ह्यातही किडनी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

किडनी हा मानवाच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे. शरीरातील विष किंवा कचरा काढून टाकणे, शरीरातील रक्त आणि अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर फेकणे आणि स्वच्छ करणे, लाल रक्तपेशींसाठी हार्माेन्स तयार करणे, तसेच व्हिटॅमिन-डीचे शोषण वाढविण्याचे काम किडनी करते. बदलती जीवनशैली खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील अकरा महिन्यांत ८,६१० रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले आहेत.

दरमहा अशी आहे डायलेसिस रुग्णांची आकडेवारी

  • एप्रिल ७०९
  • मे             ७३०
  • जून             ७७५
  • जुलै            ७८७
  • ऑगस्ट ७५७
  • सप्टेंबर ७२५
  • ऑक्टोबर ६८३
  • नोव्हेंबर ७५३
  • डिसेंबर ९१६
  • जानेवारी ९१०
  • फेब्रुवारी ८६५
  • एकूण ८,६१०

 डायलेसिस मशीनद्वारे अशुद्ध घटक बाहेर काढून शुद्ध रक्ताचा पुरवठाकिडनी निकामी ठरल्यानंतर रुग्णाला वाचविण्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. सुपरच्या डायलेसिस युनिटमध्ये एकूण १९ मशीन आहेत. या मशीनद्वारे रुग्णांच्या शरीरातील रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. ही मशीन किडनीसारखेच कृत्रिमरीत्या काम करते. किडनीग्रस्त रुग्ण हा डायलेसिस उपचार घेऊन १५ वर्षांपासून जास्त काळ जगू शकतो.

ही लक्षणे आढळताच डॉक्टरांचा सल्ला घ्याकिडनी निकामी झाल्याचे काही लक्षणावरून दिसून येते. यामध्ये लघवीचा रंग बदलणे, सतत लघवीला होणे, लघवी करताना जळजळ होणे, घोट आणि पाय सुजणे, मळमळ किंवा उलट्या होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, पाठदुखी होणे, ओटीपोटात दुखणे अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे उपचार हे मोफत होतात. मागील अकरा महिन्यांमध्ये ८,६१० रुग्णांवर डायलिसिस उपचार केले आहेत. तर सहा रुग्णांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियादेखील यशस्वी केल्या आहेत. किडनीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीपासून दूर राहणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. 

 

टॅग्स :Amravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल