असाईमेंट
अमरावती : राज्यात रेशन कार्डवर मे आणि जून महिन्यांचे धान्य मोफत वाटपाची घोषणा शासनाने लॉकडाऊन काळात केली होती. मात्र, अनेक ठिकाणी दोन महिन्यांचे धान्य एकाच महिन्यात दिल्याचे समोर आले आहे. अनेकांना मिळालेले धान्यदेखील पुरेसे नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. बहुतांश दुकानदार कार्डधारकांना धान्य देण्याच्या आधीच अंगठा घेत आहेत. त्यामुळे आधी धान्य घ्या, मग अंगठा द्या, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. कडक निर्बंधाची घाेषणा करताना सरकारने अंत्योदय आणि बीपीएल कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. प्रत्येक महिन्याला ५ किलो धान्य प्रति लाभार्थी दिले जाणार होते. त्यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिले जाणार होते.
बॉक्स
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
मे महिन्यापर्यत ई पॉस मशिनवर लाभार्थ्याचा अंगठा घेण्यात येत होता. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणावरून मे महिन्यात रेशन दुकानदारांचाच अंगठा घेण्याचा निर्णय झाला आहे.
परिणामी याचा दुरुपयोग अनेक दुकानदारांनी घेतलेल्याच्या लाभार्थ्यांच्या तक्रारी आहेत.
प्रशासकीय पातळीवरूनही लाभार्थ्यांना खरोखरच धान्य दिले गेले का? याची पडताळणी करणारी यंत्रणा कार्यान्वित नाही.
बॉक्स
एकूण रेशनकार्डधारक
६,००,९९४
बीपीएल -३०६,००८
अंत्योदय-१,२४,०५५
केसरी -५४,०४९
बॉक्स
कुटुंबाचा गाडा कसा चालणार?
कोट
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र, कोरोनामुळे कामधंदेही नव्हते. परिणामी घरीच राहावे लागले. अशातच शासनाकडून मिळणारे मोफत धान्यच आधार ठरले. परंतु जून महिन्याचे धान्य अद्याप मिळालेले नाही.
- आशिष मानकर,
लाभार्थ्यी
कोट
मे महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून धान्य देण्यात आले. जून महिन्यात केंद्राकडून मोफत व नियमित धान्यही वितरित झाले आहे. त्यामुळे गोरगरिबांना वेळेवर धान्य मिळणे आवश्यक आहे.
- गजाजन कावरे,
लाभार्थी
कोट
आधीच रोज काम मिळविणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत रेशन दुकानावरील मिळणारे धान्य मोठा आधार ठरत आहे. धान्य न मिळाल्यामुळे रोजचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न पडत आहे.
- सचिन सहारे,
लाभार्थी
कोट
रेशन कार्डधारकांनी अंगठा ई पॉस मशिनवर धान्य देता येणार आहे.त्याशिवाय धान्य घेवू नये धान्याबाबत काही तक्रारी असल्यास जिल्हा किंवा तहसील स्तरावर अडचणी लेखी स्वरूपात द्याव्यात.
- अनिल टाकसाळे,
उशजिल्हा पुरवठा अधिकारी