खरेदी करताना ही घ्या काळजी
सोयाबीन तेलात रिफाईंड तेलाची भेसळ केली जाते. पामतेलदेखील सोयाबीन तेलात मिसळले जात असल्याने ते आरोग्यसाठी हानीकारक ठरले. तसेच जुन्या पिंपांचा वारंवार तेल पॅकिंगकरिता वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
सणासुदीत अधिक भेसळ
सणासुदीला दुग्धजन्य पदार्थ व तेलाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे उत्तम दर्जाच्या पॅकिंग असलेल्या पदार्थात स्वस्त पदार्थांची भेसळ करून अधिक नफा कमावण्याचा प्रकार अधिक प्रमाणात वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अन्न व औषध प्रशासनाने ३१ ठिकाणी धाडी टाकून केलेल्या कारवाईत २ अप्रमाणित आण १३ नमुने अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोट
सणासुदीच्या काळात भेसळीचा प्रकार वाढू शकतो. त्यामुळे आम्ही ठिकठिकाणी नमुना तपासणी करतो. त्याअनुषंगाने ४४ नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये ७ अप्रमाणित आढळले. उर्वरित नमुने अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.
- सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त अन्न
भेसळ किती?
कधी घेतलेलेले नमुने भेसळ
२०२० - १७ ठिकाणी धाडी टाकण्यात आली. ११९८९७४ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
२० २१ - ७२ नमुने तपासणी करण्यात आली ७ अप्रमाणित आढळून आले.