शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

मरण पत्करू, पण घरे सोडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:10 PM

चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली.

ठळक मुद्देशासनाकडे दाद मागू : संजय गांधीनगरवासीयांच्या भावना, केंद्रीय मंत्र्यांंकडे धाव घेणारनितीन गडकरी यांना संजय गांधीनगरवासी आज भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दशकांपूर्वी मागच्या पिढीत कुडा-मातीची घरे होती. आता परिश्रमपूर्वक त्याजागी पक्के घर साकारली. त्यासाठी आमच्या आई-वडिलांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्या आठवणींचा ठेवा या परिसरात आहेत. आम्ही येथे खेळलो, वावरलो, लहानाचे मोठे झालो. त्यामुळे मरण पत्करू, पण हा परिसर, घरे सोडणार नाही, अशा भावना संजय गांधीनगर क्रमांक २ येथील नागरिकांच्या आहेत.संजय गांधीनगरवासीयांना घरे हटविण्यासाठी सात दिवसांचा अवधी वनविभागाने दिला. बडनेरा मार्गावरील जुन्या बायपासलगत राखीव वनजमिनीवर सन १९८२ पासूनचे अतिक्रमण संजय गांधीनगर क्रमांक-२ म्हणून नावारूपास आले. गरीब, सामान्य, कामगार, मोलमुजरी करून उपजीविका करणारी ही लोकवस्ती आहे. रमाई आवास योजनेतून कुडामातीच्या झोपड्यांनी आता पक्क््या घराचे स्वरूप घेतले. आता शासनादेशानुसार वनजमिनींवर अतिक्रमण मोकळे करण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. वडाळी वनक्षेत्र अधिकारी कार्यालयाने गुरुवार, ९ नोव्हेंबरला वनजमिनीची नोंद असलेल्या संजय गांधीनगर क्र. २ येथील २७९ रहिवाशांना नोटीस बजावून सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. वनविभागाची नोटीस हाती पडताच स्थानिक रहिवासी हादरून गेले. आयुष्य जेमतेम स्थिरावले असताना पुन्हा फरपट येणार का, अशी विचारणा ते एकमेकांना करताना आढळले. मुला-बाळांचे शिक्षण, भविष्याचे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत ११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे संजय गांधीनगरवासी कैफीयत मांडणार आहेत.संजय गांधीनगरात या आहेत सुविधाराखीव वनजमीन अशी नोंद असलेल्या संजय गांधीनगरात महापालिका, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणेने विविध सोईसुविधा प्रदान केल्या आहेत. पाच समाजमंदिर‘, एक हनुमान व महादेव मंदिर, चार बालवाड्या, चार अंगणवाड्या, दोन वाचनालये, एक व्यायामशाळा आणि एक उद्यान साकारले आहे.काय म्हणतात नागरिकसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदरसंजय गांधीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वत:च्या हाताने साकारला आहे. आयुष्य याच मातीत गेले. आता घरे कसे सोडणार? याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.- उत्तमराव धंदर१९८२ पूर्वीपासून येथेच वास्तव्यास आहे. पोटाला चिमटा देत पै-पै जमा केला. कसे तरी घर बांधून मुला-बाळांचा सांभाळ केला. नातवंडे झालीत. आता प्रशासन म्हणते, घर तोडा. त्यापेक्षा मरण आलेले बरे.- कमलाबाई डहाकेप्रशासनाने संजय गांधी नगरवासीयांना पायाभूत आणि मूलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत. मोलमजुरी करून घर साकारले. मुला-बाळांना शिकवून त्यांनी उंच भरारी घ्यावी, हे स्वप्न रंगवित असताना आता घर राहणार नाही अशी स्थिती उद्भवली आहे.- शीला भडके