उत्पन्न कमी आणि इंधन दरवाढीमुळे खर्च वाढला
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाची यंत्रणा अहोरात्र प्रवाशांना ने-आण करण्याचे काम करीत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या असल्या तरी महामंडळाने तिकिटाचे दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी असले तरी इंधन दरवाढीने महामंडळाचा आर्थिक भार वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्या मार्गावर १९ रुपये किलोमीटरपेक्षा अधिक उत्पन्न मिळते, अशा मार्गावर एसटी बस प्राधान्याने धावत आहेत. आगामी सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सद्यस्थितीत परिवहन महामंडळाच्या ३६८ पैकी २५० बस धावत आहेत. ११८ बस सध्या आगारात उभ्या आहेत. पुढील काळात सर्व बस टप्याटप्याने सुरू होतील.
बॉक्स
११८ बस आगारात
ज्या मार्गावर प्रवासी प्रतिसाद अन् उत्पन्न अधिक आहे, अशा मार्गावर एसटी बस प्राधान्याने सोडल्या जात आहेत. सद्यस्थितीत २५० एसटी बस जिल्ह्याची विविध भागात प्रवाशांना ने-आण करण्याचे काम करीत आहेत.
बॉक्स
रक्षाबंधनाच्या पर्वावर जादा बस
रक्षाबंधनाचा सण २२ ऑगस्ट रोजी आहे. त्यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त एसटी बस रस्त्यावर आणल्या आहेत. यामध्ये लांब पल्ला, मध्यम पल्ला, शहरी भाग व ग्रामीण भागाचा समावेश आहे. यात प्रामुख्याने नागपूर, यवतमाळ, अकोला, परतवाडा, वरूड, दर्यापूर व अन्य प्रमुख मार्गावर बस धावणार आहेत.
कोट
डिझेलच्या किमती वाढल्याने एसटीचा प्रतिकिलोमीटर खर्च वाढलेला आहे. पुढील काळात एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी रक्षाबंधनच्या पर्वावर अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन तयार करण्यात आले.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक
बॉक्स
जिल्ह्यातील आगार आणि मिळालेले उत्पन्न
अमरावती- १४.६३
बडनेरा-३.६१
परतवाडा -३.७५
दर्यापूर - ३.२२
चांदूर बाजार -२.३६
मोर्शी -२.०३
वरूड -३.९७
चांदूर रेल्वे -२.४६