लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यांच्या एसटी आगारातील डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद होता. याचा मोठा मन:स्ताप चालकांना होत असल्याने याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर तातडीने याठिकाणचे डिझेलपंप सुरू करण्यात आले. यामुळे चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत गाड्या धुणेही सोयीचे झाले आहे.बडनेरा एसटी आगारातून मोठ्या संख्येत प्रवाशी वर्ग आहे. या आगारातून जवळपास ४२ बसेस इतरत्र धावतात. त्यात लांब पल्ल्यांवर जाणाºया गाड्यांची मोठी संख्या आहे. बीड, लातूर, नांदेड, भोपाळ, बऱ्हाणपूर, नागपूर, छिंदवाडा यासह इतरही मोठ्या शहरांमध्ये या आगारातून बसेस धावतात. आगारात उशिरा रात्री बसेस घेऊन येणाऱ्या चालकांना दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाकरिता गाड्यांमध्ये डिझेल भरणे अत्यावश्यक असते. मात्र तब्बल सहा महिन्यांपासून बडनेºयाच्या आगारातील डिझेलपंप बंद असल्यामुळे चालकांना दररोज बसमध्ये डिझेल भरण्यासाठी अमरावती आगारात जावे लागत होते. अमरावती आगारातील व बडनेरा आगारातील बसेसची डिझेल पंपावर एकच गर्दी होत होती. एक तासपर्यंत बसेसला डिझेल भरून घेण्यासाठी ताटकळत राहावे लागत होते. थकून आलेल्या चालकाचा बराचसा वेळ डिझेल भरण्यासाठी जात होता त्यांना त्याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर अवघ्या काही दिवसांतच बडनेरा आगारातील डिझेल पंप सुरू करण्यात आले. यामुळे आगारातील चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेल पंप व गाड्या धुण्याची मशीन सुरू झाल्याची पुष्टी एका कर्मचाºयाने केली आहे.गाड्या धुणेही सुरूडिझेलपंप सोबतच गाड्या धुणेही बंद होते. गाड्या धुणेही सुरू करण्यात आले आहे. पाण्याच्या टाक्या नव्याने बसविण्यात आल्या आहे याचेदेखील वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. गाड्यांमध्ये प्रवाशी उलट्या करतात, तशा अस्वच्छ गाड्या प्रवाशांच्या सेवेत धावत होत्या. यामुळे प्रवासी वर्गांमध्ये संताप व्यक्त होत होता. आता दररोज एसटी गाड्या धुतल्या जात आहे.
बडनेरा आगारातून डिझेल भरणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:14 AM
लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यांच्या एसटी आगारातील डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद होता. याचा मोठा मन:स्ताप चालकांना होत असल्याने याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर तातडीने याठिकाणचे डिझेलपंप सुरू करण्यात आले. यामुळे चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत गाड्या धुणेही सोयीचे झाले आहे.बडनेरा एसटी आगारातून मोठ्या संख्येत प्रवाशी वर्ग आहे. या ...
ठळक मुद्देचालकांना मोठा दिलासा : सहा महिन्यांपासून होता बंद