शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

व्यवहारांत अडचणी : चलन बंद होणार असल्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 5:00 AM

नोटा बंद होणार असल्याच्या सर्वत्र ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे आणि निर्माण झालेल्या धास्तीमुळे असे विपरीत परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. चलन नाकारणे हा गुन्हा असताना राजरोसपणे अनेक प्रतिष्ठानांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत. प्रशासनातील कुणाचेही चालताबोलता घडणाऱ्या या गुन्ह्यांवर नियंत्रण नाही. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसल्यामुळे आम्ही काही करू शकणार नाही, असे गुळगुळीत उत्तर अधिकारी देतात.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २००० रुपयांच्या चलनी नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा आणि त्यामुळे त्या नोटांचा व्यवहार करतानाची धास्ती अंबागरीतील व्यवहारांवर परिणाम करीत असल्याचे चित्र आहे.नोटा बंद होणार असल्याची अधिकृत माहिती कुठेही जारी झाली नसली तरी दोन हजारांच्या चलनबंदीच्या भीतीमुळे डॉक्टरांसह अनेक व्यावसायिकदेखील नोटा स्वीकारण्यास नकार देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.२००० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या माहितीचा सोशल मीडियावर अनियंत्रित प्रसार झाला. दोन हजार रुपयांच्या नोटा बरेच दिवसांपासून चलनातही दिसत नाहीत. ऑटो ट्रेलिंग मशीन (एटीएम)मध्येही या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. मोजक्याच मशीन्समधून २००० रुपयांच्या नोटा मिळतात. त्यामुळे या नोटांसंबंधीच आणि शासन त्याबाबत काही निर्णय घेऊ शकेल यासंबंधाने जनतेत उत्सुकला वाढलेली आहे. हा गुलावी नोटांचा हा तुटवडा असताना शासनाने दोन हजार रुपयांच्या नोटा कमी छापल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे 'डॉट्स कनेक्ट' करून लोक आणि व्यापारी वेगवेगळा अर्थ काढत आहेत.दोन हजारांची नोट रुग्णालयातही चालेना !गुलाबी नोटा बंद होणार असल्याची धास्ती इतकी की, परवा एका रुग्णालयात आयसीयूमधील रुग्णावर उपचार करण्यासाठी नातेवाईकाला काही रक्कम जमा करावी लागली. रुग्णालय व्यवस्थापकाने दोन हजारांच्या नोेटा स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. दोन हजार रुपयांच्या नोटा आम्ही स्वीकारत नाही, असे थेट सांगण्यात आले. नातेवाईकाने सारे प्रयत्न केले; पण दोन हजारांची एक नोट बदललीच गेली नाही. तेवढी एक नोट स्वीकारा, अशी गळ त्याने घातल्यावर रुग्णालय प्रशासनाने ती एकच नोट असल्यामुळे स्वीकारत असल्याचे सांगून व्यवहार पूर्ण केला.नोटा बंद होणार असल्याच्या सर्वत्र ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे आणि निर्माण झालेल्या धास्तीमुळे असे विपरीत परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. चलन नाकारणे हा गुन्हा असताना राजरोसपणे अनेक प्रतिष्ठानांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत. प्रशासनातील कुणाचेही चालताबोलता घडणाऱ्या या गुन्ह्यांवर नियंत्रण नाही. कुणाची तक्रार प्राप्त झाली नसल्यामुळे आम्ही काही करू शकणार नाही, असे गुळगुळीत उत्तर अधिकारी देतात.दोन हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे धोरण जसे काही मोठ्या प्रतिष्ठानांनी स्वीकारले आहे, तशीच लहान दुकानदारांनीही त्या नोटा स्वीकारण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. 'सुटे नसल्या'चे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.आरबीआयने अधिकृत घोषणा केली नसली तरीही व्यावसायिकांत दोन हजार रुपयांच्या चलनबंदीचे भय आहे. सामान्य माणसाने दोन हजारांची नोट पोटाला चिमटा घेऊन सांभाळून ठेवली असेल आणि ऐनवेळी ती नाकारली जात असेल तर त्याने करायचे तरी काय ?बंदीची अफवायासंबंधाने विविध तज्ज्ञांशी चर्चा केली असता चलनाबाबतचा सर्वंकष निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अख्यारितील असल्यामुळे कुठल्याही शक्यता वर्तविल्या जाऊ शकत नाही; तथापि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवेचे व्यवहारांपवर परिणाम मात्र दिसू लागले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. हे परिणाम अमरावती जिल्ह्यात आणि लगतच्या जिल्ह्यांतही अनुभवल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.लॉकडाऊनच्या काळात दोन हजार रुपांची नोट व्यावसायिकांनी स्वीकारली नाही. मोठी गोची त्यावेळी झाली.- बाळासाहेब ढोक, नागरिक, अमरावती.दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे ? एटीएममध्ये, व्यवहारांत त्या दिसत नाहीत. त्यामुळे साशंकत निर्माण होते. चर्चा होतात.- प्रवीण देशमुख, अमरावती.

टॅग्स :Note Banनोटाबंदी