नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा: अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सपन प्रकल्पाची सुरक्षा हुल्लडबाजीने धोक्यात आली आहे. रविवारी सायंकाळी हा प्रकार ‘लोकमत’ने कॅमेऱ्यात टिपला. दोन दारे उघडण्यात आल्याने जुळ्या शहरासह आजूबाजूच्या परिसरातील काही नागरिकांनी येथे गर्दी केली होती. मात्र काहींन थेट धरणाच्या भिंतीवर जीवघेणा मार्गक्रमण केले.अचलपूर तालुक्यात सपन, चंद्रभागा आणि शहानूर असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यातील परतवाडा धारणी मार्गावर वझरनजीक सपन प्रकल्प असून रविवारी सायंकाळी जवळपास ८२ टक्के तो भरला आहे. परिणामी दोन दारे पाच सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची दारे उघडणार असल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अचलपूर परतवाडा व परिसरातील खेड्यापाड्यातील राहणारे नागरिक हा विलोभनीय नजारा प्रत्यक्ष अनुभवण्यास धरण परिसरात गर्दी करतात. रविवारी सकाळी ११ वाजता पासूनच धरणाची दारे उघडण्यात येणार असल्याची माहिती परिसरात पोहोचली. सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी हुल्लडबाजी करत थेट धराणच्या भींतीवर चढाई केली.त्यांना कुणीही हटकले नाही.सुरक्षिततेला वाटाण्याच्या अक्षताअल्प मनुष्यबळाचा फटकासपन धरण प्रकल्पचा परिसर एक किलोमीटर आहे.त्यासाठी केवळ चार सुरक्षारक्षक असून अल्प मनुष्यबळावर या धरणाची सुरक्षा आहे. प्रकल्प ८२टक्के भरल्याने दोन दारे पाच सेंटीमीटर उघडण्यात आली. पुढील काही काळात चिखलदºयात कोसळलेल्या पाण्यामुळे धरणाचा जलसाठा वाढल्यास गतवर्षीप्रमाणे चारही दारे उघडण्यात येतील. अशाच नागरिकांचे लोंढे परिवारासह येथे दाखल होतात. पूर्णता सुरक्षा भेदत नागरिक वाट्टेल तसे वागत असल्याचा प्रकार येथे नेहमीचा आहे. येथील अभियंत्यांना सुद्धा हुल्लडबाज जुमानत नसल्याचे अनुभवावरून सांगण्यात आले.धूम स्टाईल सुसाट वेगाने दुचाकीसपन प्रकल्पाला जाण्यासाठी असलेला मार्ग हा उंच सखल भागात असल्याने पाणी वाहून जाणाºया पुलापर्यंत उतार आहे. येथील दुचाकीस्वारांची धूम स्टाईल जीवघेणी ठरत आहे. त्याला आवर घालण्याची मागणी होत आहे. अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.धरण परिसरात वर चढणे किंवा इतर अपकृत्य करणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र नागरिक प्रकल्पाचा भव्य परिसर पाहता अशी कृत्य करतात. ते जुमानत नाहीत. धरणाच्या भिंतीवर चढणाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. तसे वरिष्टांना कळविले आहे.-सुबोध इंदूरकर,उपअभियंता, सपन प्रकल्प
धरणाच्या भिंतीवर थेट चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 5:00 AM
अचलपूर तालुक्यात सपन, चंद्रभागा आणि शहानूर असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यातील परतवाडा धारणी मार्गावर वझरनजीक सपन प्रकल्प असून रविवारी सायंकाळी जवळपास ८२ टक्के तो भरला आहे. परिणामी दोन दारे पाच सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची दारे उघडणार असल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अचलपूर परतवाडा व परिसरातील खेड्यापाड्यातील राहणारे नागरिक हा विलोभनीय नजारा प्रत्यक्ष अनुभवण्यास धरण परिसरात गर्दी करतात.
ठळक मुद्देसपन प्रकल्पावर हुल्लडबाजांची चंगळ : जीवघेणा थरार, नियंत्रण कुणाचे