लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनेक बँकांमधील कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसौय होत आहे. विशेषत: शनिवार, रविवारी त्या बंद असतात. त्यामुळे बँक ग्राहकांना पैसे खात्यात जमा करण्यासाठी काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. मशीन बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे.सीडीएमसंदर्भात विचारले असता, बँकेचे अधिकारी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगतात. मात्र, बँकांना सीडीएमची सेवा पुरविणाऱ्या अधिकृत कंपनी जर सेवा देण्यास हयगय करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा सवाल नागरिकांचा आहे.सर्वाधिक अडचण ही स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीडीएममध्ये येत असून, कॅम्प शाखा तसेच श्याम चौकातील सीडीएम गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. विचारणा केली असता, तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. कॅम्प शाखेतील मशीन काही तासांसाठी सुरू झाली आणि पुन्हा बंद पडल्याने नागरिकांना पैसे खात्यात जमा करण्यासाठी बँकेत रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.बँक आॅफ इंडियाच्या जयस्तंभ चौकातील शाखेतसुद्धा सीडीएम अनेकदा बंद राहत असल्याची नागरिकांची ओरड आहे. इतरही बँकांची तीच स्थिती आहे. एकीकडे सीडीएम बंद राहते, तर दुसरीकडे पैसे भरण्यास काऊंटरवर गेल्यास ५० हजारांच्या आतील रक्कम मशीनद्वारे भरण्याचा सल्ला रोखपाल देतात. त्यामुळे नागरिकांनी जायचे कुठे, हा प्रश्नच आहे.स्टेट बँक सीडीएम दुरुस्ती, देखभालीचे कंत्राट गुडगावच्या एका कंपनीला दिले आहे. स्टेट बँकेच्या शहरात १०, तर जिल्ह्यात ५० शाखा आहेत. मोठ्या शाखांमध्ये सीडीएम लावण्यात आल्या आहेत.एका वेळेच्या कॅश डिपॉझिटसाठी २५ रुपयेसीडीएम म्हणजे कॅश डिपॉझिट मशीनमध्ये एका वेळेला पैसे टाकायचे असेल, तर ग्राहकाच्या खात्यातून २५ रुपये कापले जातात. हे सेवा शुल्क असल्याची माहिती एका अधिकाºयाने दिली. पण, सेवा मात्र देण्यात येत नाही. ग्राहकांना सेवा मिळत नसेल, तर संबंधित कंपनीवर काय कारवाई करणार, असा सवाल नागरिकांचा आहे. बँकेचे अधिकारी मात्र मार्ग काढण्याऐवजी हात वर करण्यात धन्यता मानत असल्याचे वास्तव आहे.बँक अधिकारी गप्पसीडीएम बंद का, याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते गप्प राहिले. पण, एका लिपिकाने सांगितले की, सीडीएममध्ये क्षमतेएवढी कॅश जमा झाली असेल, तर ती काढेपर्यंत मशीन बंद राहते. त्यामुळे अनेक दा मशीन बंद राहिल्याची माहिती त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.सीडीएम व एटीएम ही ग्राहकांसाठी सेवा आहे. त्याचे नियंत्रण प्रत्येक बँकेच्या व्यवस्थापकांकडे असते. सेवा मिळत नसल्याची बँकेत तक्रार आल्यास ती वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.- जितेंद्र झा, जिल्हा प्रबंधक सेंट्रल बँक आॅफ इंडियासीडीएममध्ये ग्राहकांना सेवा दिल्यानंतरच पैसे कपात होतात. सेवा न देता पैसे कापल्यास व सेवा मिळाली नाही, तर संबंधितांना ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक मंचात दाद मागता येते.- वसुसेन देशमुखअभियोक्ता
सीडीएम यंत्रणा बंद ग्राहकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:38 AM
शहरातील अनेक बँकांमधील कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) बंद असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसौय होत आहे. विशेषत: शनिवार, रविवारी त्या बंद असतात. त्यामुळे बँक ग्राहकांना पैसे खात्यात जमा करण्यासाठी काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. मशीन बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे.
ठळक मुद्देतांत्रिक कारण : कंपनीवर कारवाई केव्हा? ग्राहकांनी जायचे कुणाकडे?