अमरावती : शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून नवी ओळख आता शहराची होऊ लागली आहे. मात्र, गणेश उत्सवात खड्डे बुजविले गेले नाही. शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे आजार उद्भवत असून शहरात किरकोळ अपघातही वाढले आहे.
शहरातील पंचवटी ते कॅम्प, कॅम्प ते जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प ते पंचवटी, पंचवटी ते वेलकम पॉईंट, तसेच अनेक मार्गावर खड्डे झाले आहेत. मुसळधार पावसामुळे जरी रस्ते उखडल्याचे अधिकारी सांगत असले तरी गत सहा महिन्यापासून खड्डे कायम आहेत. शहरात खड्यांवरून दुचाकी गेल्यास अपघाताची शक्यता असून वृद्ध नागरिकांना कमरेचे तसेच मणक्याचे आजार वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या बांधकाम विभागाला केली आहे.