शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
2
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
3
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
4
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
5
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
6
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
7
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
8
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
9
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
10
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
11
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
12
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
13
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
14
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
15
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
16
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
17
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
18
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
19
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
20
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पोलीस-युवासेनेच्या वादात दहीहंडीवर विरजण

By admin | Published: September 07, 2015 12:26 AM

स्थानिक जयस्तंभ चौकात युवासेनेच्यावतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आणि ऐन रंगात आलेली ही स्पर्धा रद्द करावी लागली.

प्रेक्षक बिथरले : डीजे तपासताना झाली बाचाबाची, रंगलेली स्पर्धा रद्दअमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकात युवासेनेच्यावतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आणि ऐन रंगात आलेली ही स्पर्धा रद्द करावी लागली. त्यामुळे दर्शकांचा हीरमोड झाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दहीहंडीत वाजविल्या जाणाऱ्या डीजेची तपासणी करताना पोलीस आणि आयोजकांचा रविवारी वाद झाला. पोलिसांनी ‘नो पार्किंग’मधील दुचाकी उचलल्याने त्यात भर पडली. नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी पोलीस परवानगीनुसार जयस्तंभ चौकात दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. सुरूवातीला अनाथ मुलांनी सलामी दिली. नियोजनानुसार स्पर्धा सुरु झाली. पाण्याचा मारा आणि डीजेच्या तालावर गोविंदा मनोरे रचत होते. प्रेक्षकही जल्लोष करीत होते. ुउत्साह शिगेला पोहोचला असतानाच अचानक ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने डीजेची तपासणी केली. आवाज ७५ डेसिबलपेक्षा अधिक असल्यामुळे पोलिसांनी डीजे बंद करण्याचे फर्मान सोडल्याचे युवासेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे वाद उद्भवला व दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आली. बक्षिसाची रक्कम अनाथालयाला युवासेनेने दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या चमूसाठी तीन बक्षिसे जाहीर केली होती. त्यामध्ये अनुक्रमे ५१ हजार, २१ हजार व ११ हजारांची तीन बक्षिसे देण्याचे ठरविले होते. मात्र, दहीहंडी स्पर्धेत विघ्न आल्यानंतर ही बक्षिसांची रक्कम अनाथालयाला दान करण्यात येईल, अशी माहिती नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी दिली.