शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

विलगीकरणाला फाटा, घनकचऱ्याची प्रक्रियेविनाच विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 10:03 PM

प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचºयाचा डोंगर साचला आहे.

ठळक मुद्देकचराकोंडी : सुकळीचे प्लास्टिक प्रेसिंग युनिट ठरले पांढरा हत्ती, डीपीआरला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :प्रशासन व राजकीय कुरघोडीत अडकलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअभावी शहरातील घनकचऱ्याची विनाप्रकियाच विल्हेवाट लावली जात आहे. कंत्राटदारांकडील वाहनांमध्ये कचरा विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नसल्याने ओला व सुका कचरा एकत्रित संकलित करुन सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचºयाचा डोंगर साचला आहे.आठ लाख लोकसंख्येच्या महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी २५० ते ३०० टन कचरा निघतो. कंत्राटदारांच्या माध्यमातून तो संकलित केला जातो. आॅटो व घंटीकटल्याच्या माध्यमातून संकलित केलेला एकत्रित कचरा विविध प्रभागात ठेवलेल्या कंटेनरमध्ये टाकला जातो किंवा नेमून दिलेल्या खुल्या जागेत साठविला जातो. तेथून कंत्रादाराच्या वाहनातून तो कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन साठविला जातो. सुकळी कंपोस्ट डेपोत आधीच ७ ते ८ लाख मेट्रीक टन कचरा विनाप्रक्रिया पडून आहे. त्यात दिवसाकाठी निघणाºया २५० ते ३०० टन कचºयाची भर पडत आहे. नगरविकास विभागाने वारंवार शासनादेश काढून १०० टक्के कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट महापालिकेला दिले. मात्र, महापालिकेला अद्यापही ते उद्दिष्ट गाठता आलेले नाही. दररोज १०० किलो व त्यापेक्षा अधिक कचरा निर्मिती होणाºया सदनिका व वसाहतींनी निर्मितीच्या जागीच कचºयावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात तसा प्रयोग करण्यास कुणीही धजावलेला नाही. स्वच्छ सर्वेक्षण २०१७ मध्ये शहर २४१ व्या क्रमांकावर राहिल्याने हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करणारा प्रकल्प इतवारा बाजारात कसाबसा साकारण्यात आला. हॉटेल वेस्टवर प्रक्रिया करणारा १ मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प वगळल्यास शहरातील घनकचºयाची विनाप्रक्रिया वाहतूक व विल्हेवाट लावली जाते. सुकळी ग्रामस्थांचा कचरा साठवणुकीला विरोध वाढू लागला आहे.‘तो’ प्रकल्प बंदचसुकळी कंपोस्ट डेपोत गाजावाजा करुन प्लास्टिक प्रेसिंग युनिट उभारण्यात आले. दैनंदिन कचºयातून निघणारे प्लास्टिक वेगळे करुन त्याचे आकारमान कमी करायचे व त्या प्लास्टिकच्या गाठी विकायच्या असा त्यामागील हेतू होता. २ आॅक्टोबर २०१६ रोजी त्याप्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तथापि तेथे शहर फिडरवरुन थ्री फेज विजपुरवठा नसल्याने अपवाद वगळता तो प्रकल्प सुरुवातीपासून बंदावस्थेत आहे.तीन प्रकल्प प्रस्तावितसुकळी कंपोस्ट डेपोत २००, अकोली बायपास भागात १०० व बडनेरा कोंडेश्वर येथे ५० मेट्रीक टन क्षमतेचे तीन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या ४०.७० कोटी रुपयांच्या डीपीआरला राज्यसरकारने आठवड्यापूर्वी तत्वत: मान्यता दिली आहे. महापालिका प्रशासनाला त्या प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.आरोग्याचा प्रश्नशहरातील कचऱ्याच्या समस्येने डेंग्यू व साथीच्या अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. सुक ळी कंपोस्ट डेपोत साठविलेल्या कचºयाची दुर्गंधी व तेथील कचऱ्याला वारंवार लागणाºया आगीच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्याच्या डोंगराला लागणाºया आगींमुळे प्रदुषणात भर पडली आहे. पावसाळयात या घनकचऱ्याला प्रचंड दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते.