शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

चांदूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामात शासनाकडून दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:29 PM

तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : रस्ते ३० टक्के; निधी मिळाला तीन कोटी

आॅनलाईन लोकमतचांदूररेल्वे : तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.शासनाकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहाराने चांदूररेल्वे तालुक्यातील असणाºया रस्त्यांच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत अवगत केले होते. शासनाकडून याबाबत दखल न घेता जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व तालुक्यांच्या प्रमाणात चांदूररेल्वे तालुक्यात मुख्य रस्ते २९.८८ टक्के असताना तीन कोटींचा अत्यल्प निधी दिला, तर कमी रस्ते असणाºयाच्या तालुक्याला १२ कोटी निधी; असे पक्षपाती धोरण २०१७ ते २०१८ च्या अंदाजपत्रकात नमूद आहे. मतदारसंघातील रस्त्याच्या बांधकामाबाबत मी वेळोवेळी पालकमंत्र्यांना निवेदने देळन चर्चा केली. विरोधी पक्षाचा आमदार असल्याने माझ्या मतदारसंघाला निधी देण्याबाबत अन्याय होतो. याबाबत जिल्ह्यातील आकडेवारीसह माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आल्याचे आ. जगताप यावेळी म्हणाले. जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी पत्रकार परिषदेला हजर होते.पालकमंत्र्यांनी निधी आणून कार्यक्षमता दाखवावीसरकारच्या जीएसटीच्या गोंधळामुळे ठेकेदारांचा रस्त्याच्या कंत्राटाला प्रतिसाद मिळाला नाही. सध्या चांदूर-तळेगाव (द.), चांदूर-कुºहा, चांदूर-पळसखेड या रस्त्यांचे खड्डे भरण्याची कामे सुरू झाली. शासनाने मागील चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत बांधकामासंबंधी वेळोवेळी अंदाजे ३० शासननिर्णय काढलेत. निर्णयात वेळोवेळी बदल करण्यात आल्याने नवीन निविदा प्रसिद्ध करण्यात वेळ गेला. आताचे पालकमंत्री समान निधीचे सूत्र ठरवून सर्व मतदारसंघाला सारखा निधी वाटत आहेत. त्यामुळे धामणगाव मतदारसंघात सर्वाधिक रस्त्याची टक्केवारी असताना निधीअभावी कामे होऊ शकली नाही. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आहे व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शासनाकडून अतिरिक्त निधी खेचून आणण्याची क्षमता त्यांनी दाखवायला हवी, असेही मत आ. जगताप यांनी व्यक्त केले.