लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हिंदू स्मशानभूमीत अस्थिकलशाची अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. अस्थिकलश उचलून नेताना संस्थेतील एक कर्मचारी सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे मृताचे नातेवाईक संपप्त झाले होते. नातेवाइकांनी संस्थेच्या विश्वस्तांना जाब विचारल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. मृताचे नातेवाईक संबंधित प्रकाराची तक्रार राजापेठ पोलिसात करणार आहे.विजय नारायणदास रॉय (६२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी अस्थिकलश हिंदू स्मशानभूमीतील लॉकरमध्ये ठेवण्यात आला. मंगळवारी तिसºया दिवशी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे पुढील विधीसाठी रॉय कुटुंबीय स्मशानभूमीत पोहोचले. नातेवाइकांनी लॉकरमधील अस्थिकलश घेऊन विधीवत पूजा सुरू केली. यादरम्यान रॉय कुटुंबातील एका सदस्याने स्मशानभूमीतील ओटा क्रमांक १ वर अस्थिकलश ठेवला. त्यानंतर ते मुंडन व दशक्रियेच्या विधीसाठी गेले. दशक्रिया आटोपून आलेल्या राजू रॉय यांना अस्थिकलश दिसला नाही. या प्रकाराचा जाब त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. त्यानंतर संस्था अध्यक्ष आर.बी. अटल यांना माहिती दिली. अटल यांच्यासह सचिव विजय लढ्ढा, राजेश हेडा व अन्य विश्वस्त पोहोचले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन सीसीटीव्हींची पाहणी केली असता, भोला नामक कर्मचारी अस्थिकलश उचलून नेताना आढळून आला. त्यांनी भोलाला बोलावून अस्थिकलश आणण्यास सांगितले. मात्र, भोलाला अस्थिकलश दिसलाच नाही. तो शोधून आणण्याची ताकीद विश्वस्तांनी दिली. त्यानंतर सायंकाळपर्यंत भोला परतला नव्हता.जादूटोण्याचा संशयहिंदू स्मशानभूमीतील कर्मचाºयांनी जादूटोण्यासाठी अस्थिकलश नेल्याचा संशय रॉय कुटुंबीयांत बळावला होता. कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत कामे करतात. भोला नामक कर्मचाºयाने अस्थिकलश उचलून नेला आणि बाहेर फेकून अवहेलना केल्याचे रॉय कुटुंबीयांना आढळून आले.यापूर्वी खड्ड्यातील मृत बाळ बेपत्ताहिंदू स्मशानभूमीतील भोंगळ कारभार यापूर्वीही चर्चेत आला होता. नवजाताला दफन केल्यानंतर ती जागा उखरून मृतदेह बेपत्ता केला होता. त्यावेळी सुध्दा मृताच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता. प्रकरण राजापेठ पोलिसांपर्यंत गेले होते.रॉय यांचा अस्थिकलश ओट्यावरच ठेवला होता. स्वच्छता सुरू असताना ओट्यावरील अस्थिकलश कर्मचारी उचलून नेत असल्याचे दिसत आहे. तो कलश बाहेर नेऊन ठेवल्याचे सांगत आहे. तो कलश शोधून आणण्यासाठी सांगण्यात आले.- आर. बी. अटल, अध्यक्षहिंदू स्मशानभूमी संस्थानअस्थिकलश ओट्यावर ठेवल्यानंतर हिंदू संस्कृतीनुसार विधी सुरु होता. मुंडण, दशक्रिया कार्यक्रमात सर्व मग्न होते. त्यावेळी तेथील कर्मचाºयाने अस्थिकलश उचलून नेला. जादूटोणा करण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करू.- राज रॉय, मृताचे नातेवाईक
हिंदू स्मशानभूमीत अस्थिकलशाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:29 AM
हिंदू स्मशानभूमीत अस्थिकलशाची अवहेलना झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. अस्थिकलश उचलून नेताना संस्थेतील एक कर्मचारी सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे मृताचे नातेवाईक संपप्त झाले होते. नातेवाइकांनी संस्थेच्या विश्वस्तांना जाब विचारल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. मृताचे नातेवाईक संबंधित प्रकाराची तक्रार राजापेठ पोलिसात करणार आहे.
ठळक मुद्देमृताचे नातेवाईक संतप्त : संस्थेतील कर्मचारी सीसीटीव्हीत कैद