वाढोणा रामनाथ येथील चार अंगणवाडीत सात सेविका आहेत. त्यातील एका अंगणवाडीत ५० मुलांसह ५ गरोदर मातांना पोषण आहार पुरविला जातो. प्रत्येक मुलाला गहू २ किलो, साखर १ किलो, चणा किलो, मूगडाळ १ किलो, हळद २०० ग्रॅम, मिरची पावडर २०० ग्रॅम, मीठपुडा आदी साहित्याचे वाटप नियमित होते. त्यापैकी मूगडाळ, चणा आणि गहू हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याच्या प्रतिक्रिया पालकांच्या आहेत. चणामध्ये काड्या, फुट, दगडाचा समावेश आहे. गव्हात खडे, कचरा आहे. मूगडाळीत भेसळयुक्त धान्य समाविष्ट आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर ते जुलै महिन्यात वाटप केल्याने परिणाम गरोदर माताचे आरोग्यावर जाणवत आहे. हे साहित्य अनियमित येत असल्याने कधी दोन महिन्यांनी वाटप करावे लागत असल्याचे अंगणवाडी सेविकेने सांगितले.
आहाराचे वाटर कोरोनाकाळापासून सुरू आहे. पूर्वी खिचडी अंगणवाडी केंद्रातच शिजवून दिली जायची. ० ते ३ वर्षापर्यंतच्या मुलींनाच पाकीटबंद आहाराचे वाटप होत होते. ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना खिचडीचे वाटप केले जात होते. परंतु कोरोनामुळे ती प्रक्रिया बंद करण्यात आली. आता सर्वच मुलांना आणि गरोदर मातांना पाकीटबंद आहार वितरण केला जात आहे.
बॉक्स
अंगणवाडीच्या आजूबाजूला अस्वच्छता
अंगणवाडीच्या परिसरात खताचे ढिगारे साठले आहेत. तेथेच हातपंप व बाजूला गवत वाढल्याने आणि इंधनामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ग्रामपंचायतीचे नळ कनेक्शन असताना त्याला पाणीच येत नाही. प्रकाश व्यवस्था नाही. घाणीचे साम्राज्य पसरल्याने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.
कोट
शासनाकडून आहार येतो. अंगणवाडीत आहार पोहचला किंवा नाही याची खात्री करणे आमचे काम आहे. तक्रार आल्यास चौकशी करता येईल.
- वीरेंद्र गलफर, महिला व बालविकास अधिकारी, नांदगाव खंडेश्वर