यंदा पावणेनऊ कोटी प्राप्त : शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी ९ लाख जमाअमरावती : गतवर्षीच्या दुष्काळस्थितीत बाकी राहलेल्या ८ कोटी ७५ लाख रुपयांचे वितरण यंदा सर्व तहसीलदारांना करण्यात आले होते. यापैकी ७ कोटी ९६ लाख २ हजार ९३८ रुपये १५ हजार ६८० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. अद्याप १ कोटी ६५ लाख ३७ हजार ६२ रुपयांचे वाटप तांत्रिक कारणांमुळे रखडले. मागील वर्षी जिल्ह्यात शासनाने दुष्काळस्थिती घोषित केली होती. प्रचलित निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी चार-चार हजार रुपयांची मदत शासनाने दिली. शासनाने यासाठी २५१ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला वितरीत केला होता. जिल्ह्यात एकूण ४ लाख ४८ हजार ६१४ शेतकरी खातेदारांची संख्या आहे. यापैकी ४ लाख ६ हजार १६० शेतकऱ्यांना २४२ कोटी ९९ लाख ६९ हजार ४५४ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. शिल्लक असलेला ८ कोटी ६६ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा निधी शासनाला समर्पित करण्यात आला होता व यामध्ये तांत्रिक कारणामुळे ५ कोटी २४ लाख २६ हजार ३५९ हजारांचा निधी शिल्लक राहिला होता. गतवर्षीचा वाटप न झालेला ८ कोटी ७५ लाखांचा निधी शासनाने यावर्षी पुन्हा उपलब्ध करुन दिला. यापैकी यामध्ये अमरावती तालुक्यात ६ हजार १६३ शेतकऱ्यांना १ कोटी ६५ लाख ६८ हजार १२५ रुपयांचे वाटप करण्यात आले. वाटपाची ही १०० टक्केवारी आहे. भातकुली तालुक्यात ४४८ शेतकऱ्यांना २१ लाख ३८ हजार ७१५ रुपयांचे वाटप करण्यात आले. धामणगाव तालुक्यात ३८२ शेतकऱ्यांना ४९ लाख ३३ हजार ८८२ रुपयांचे वाटप करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९१ लाख ४० हजार २६० रुपये, १ हजार ७४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. दर्यापूर तालुक्यात १२४१ शेतकऱ्यांना ७९ लाखाच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. अंजनगाव तालुक्यात २१२८ शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख ४८ हजार २६ रुपयांचे वाटप करण्यात आले. अचलपूर तालुक्यात ११८ शेतकऱ्यांना ६ लाा ८३ हजार ८९० रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. चांदूरबाजार येथे १५०१ शेतकऱ्यांना ७३ लाख ३७ हजार ६२० रुपयांचे वाटप करण्यात आले. वरुडमध्ये ९१८ शेतकऱ्यांना ६० लाखांचे वाटप करण्यात आले. धारणी येथे २१८ शेतकऱ्यांना ९ लाख ५५ हजार व चिखलदरा येथे १६६ शेतकऱ्यांना ७ लाख ६३ हजार रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
दुष्काळाच्या १ कोटी ६५ लाखांचे वाटप रखडले
By admin | Published: November 21, 2015 12:15 AM