सूर्योदय परिवाराचा उपक्रम : जीवदया अभियानअमरावती : तीव्र उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांना पिण्यास पाणी मिळावे म्हणून शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन हजार जलपात्रांचे वितरण करण्यात आले. इंदोर येथील सद्गुरुदत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टच्या स्थानिक सूर्योदय परिवाराच्यावतीने शहरात जीवदया अभियान राबविले जात आहे. उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कमी होतात. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळत नाही. भटकंती केल्यानंतरदेखील अनेकदा पाणी मिळत नाही. स्थलांतरित पक्ष्यांना मात्र पिण्यासाठी पाण्याचा शोध घ्यावा लागतो. ही बाब लक्षात घेता आपल्या घरी पक्ष्यांना पिण्यासाठी प्रत्येकाने पाणी ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सूर्योदय परिवाराने शहरातील विद्याभारती माध्यमिक हायस्कूल फुलबाग शाळा, गांधी विद्यालय, शाश्वत शाळा, समर्थ विद्यालय आदी शाळांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश व सूर्योदय परिवाराच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती किशोर शिरभाते यांनी दिली. कार्यक्रात राजू सुंदरकर, देशमुख, देवगावकर, अविनाश भडांगे, अभिजित बोके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राऊत, पांडे, दीपक गुल्हाने पेटले, चौधरी, अतुल गायगोले यांनी सहकार्य केले.
पक्ष्यांसाठी दोन हजार जलपात्रांचे वाटप
By admin | Published: April 11, 2016 12:09 AM