मांजरखेड कसबा : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथे २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत भवनात सामान्य फंडातून पाच टक्के रक्कम अपंगांना अनुदानस्वरूपात वितरित करण्यात आली.
मांजरखेड येथील सरपंच दिलीप गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपसरपंच किरण देशमुख, ग्रामसेवक डी.पी. इंगळे, सदस्य संतोष काळे, सुषमा देशमुख, सुधाकर कुंभलकर, ललिता भोगे, प्रणिता सव्वालाखे, सागर खोडके, फरिदा शेख सादिक, सुनंदा बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते. साहेबराव खोडके, पवन अशोक सोनोने व शालिनी गुल्हाने या लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. वसुली कर्मचारी विजय मोरे, पाणीपुरवठा कर्मचारी वासुदेव भामुदे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
कॅप्शन : अपंगांना अनुदान वाटप करताना सरपंच गुल्हाने, उपसरपंच देशमुख, ग्रामसेवक इंगळे
आदी.