शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

वैयक्तिक लाभ योजनेचे वितरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:26 PM

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आणखी दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता : लाभार्थ्यांना करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आणखी दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी नावे निश्चितीसाठी पदाधिकाऱ्यांनी घातलेला घोळ मिटत नाही तोच आता आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी काही काळ थांबावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन या विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यासाठी पंचायत समितीमार्फत अर्ज मागविले जातात. शिलाई मशीन, दळपकांडप मशिन, सायकल, ताडपत्री, कडबाकुट्टी आदी साहित्य विभागाच्यावतीने दिले जातात. पूर्वी लाभार्थ्यांची यादी निश्चित झाली की लाभार्थ्यांना थेट वस्तू दिली जायची. मात्र वस्तूच्या दर्जाबाबत लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे वस्तू खरेदी करण्याची मुभा लाभार्थ्यांना देण्यात आली. त्यासाठी मात्र स्वत:जवळील रक्कम प्रथम लाभार्थ्यांना घालवावी लागत आहे. गरीब मागासवर्गीय लोकांना मदत करण्याच्या हेतूने वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मुळात त्यासाठी घालण्यात आलेल्या कागदपत्रांची अट पूर्ण करताना लाभार्थी हातघाईस येतो. त्याची पूर्तता झाल्यानंतर त्याला उपयोगी वस्तू मिळत असते. पण पारदर्शकतेच्या नावाखाली नव्याने सुरू करण्यात आलेल्या पद्धतीमुळे लाभार्थ्यांची अवस्था 'भीक नको पण कुत्रं आवर' अशी झाली आहे.नव्या पद्धतीमध्ये लाभार्थ्यांनी प्रथम वस्तू खरेदी करायची. त्याची दुकानदाराकडून पावती घ्यायची. ती पावती पंचायत समिती कार्यालयात जमा करायची. त्यानंतर शासनाच्यावतीने देण्यात येणारे अनुदान जिल्हा परिषदेमार्फत लाभार्थ्यांच्या नावावर थेट जमा केले जायचे. यामुळे मागील दोन वर्षांपासून वैयक्तिक लाभाच्या योजनेला मिळणारा प्रतिसाद कमी होऊ लागला. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पदाधिकारी सदस्य यांच्या मर्जीतील लाभार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे यादी लवकर निश्चित होत नाही. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यादीतील नावांमध्ये घोळ असतो. त्याचा परिणाम लाभार्थ्यांची यादी तयार होण्यावर होत असतो. यादीचा घोळ नुकताच मिटला होता. लाभार्थ्यांना वस्तू मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा जिल्हा परिषदेच्यावतीने थांबविण्यात आल्याने त्यांनी वस्तू घेतली आहे. त्यांना आता त्यांच्या नावावर पैसे जमा होण्यासाठी किमान दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद