अमरावती : चार महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या संकट काळात विविध संस्थांनी जिल्हा प्रशासनाला मदत केलेली आहे. याशिवाय परदेशातून मदत मिळाली आहे. मंगळवारी सिंगापूर येथील एका कंपनीद्वारा जिल्हा प्रशासनाला आवश्यक साहित्याची मदत केलेली आहे.
कोरोना संक्रंमितांवर उपचार करीत करीत असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षितता राहावी, यासाठी टीम प्रोजेक्ट ओ-२ अंतर्गत १०० मेडिकल, जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. याशिवाय कंपनीव्दारा प्राप्त सात हजार मास्कदेखील कोरोना केअर केंद्रांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे प्रत्येक पीएचसी स्तरावर आला. १० ते १५ ऑक्सिजन बेड त्याचप्रमाणे तालुका मुख्यालयी काही आयसीयूचे बेड तयार करण्यात येत आहे. या साहित्यामुळे काही प्रमाणात मदत होत असल्याने जिल्ह्याच्यावतीने कंपनीला धन्यवाद देण्यात आल्याचे नवाल म्हणाले.