शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त शाळांना अनुदान वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:36 AM

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त शाळांचा सन्मान तथा अनुदान वितरित करण्यात आले.येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक प्रतिभा देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी, प्रमोद चांदूरकर, नितीन चव्हाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विविध खेळ प्रकारात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी करणाºया शाळांना सन्मानित करण्यात आले. यात १४ वर्ष वयोगटात प्रथम बक्षीस म्हणून तोमेय इंग्लिश स्कुलला एक लाख, द्वितीय बक्षीस ज्ञानमाता हायस्कुल ७५ हजार रुपये तर तृतीय बक्षीस स्कुल आॅफ स्कॉलर्स यांना ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच १७ वर्ष वयोगटासाठी ज्ञानमाता हायस्कुल यांना प्रथम बक्षीस म्हणून एक लाख, स्कुल आॅफ स्कालर्स यांना द्वितीय बक्षीस ७५ हजार रुपये तर तोमेय इंग्लिश प्रायमरी स्कुल तृतीय बक्षीस ५० हजार रुपयांचे धनादेश बहाल करण्यात आले. १९ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय एक लाख रुपये, द्वितीय क्रमांक रामकृष्ण क्रीडा विद्यालय ७५ हजार तर तृतीय क्रमांक विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था ५० हजार रुपयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी प्राविण्यप्राप्त १०० खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन बी.एन. महानकर यांनी केले.राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सायन्स स्कोर मैदानावर फुटबॉलचे सामने, विभागीय क्रीडा संकुलात हॉकी खेळाचे प्रदर्शनिय सामने, नेटबॉल खेळाचे सामने, इंडो पब्लिक स्कुल येथे क्रीडा साहित्याची प्रदर्शनी, मॅराथॉन स्पर्धा तर महानगर शारीरिक शिक्षक संघटनेच्यावतीने क्रीडा, खेळांचा प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली.