लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिं) या गावाला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्याने १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावातून नेरपिंगळाई तेथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाणी देण्यात यावे. या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्याने उशिरापर्यंत ग्रामस्थांनी जिल्हा कचेरीत ठिय्या दिला.सावरखेडला पाणीपुरवठा करणाºया दोन विहिरी व एक बोअर पूर्णपणे आटल्याने गावात भीषण पाणीटंचाई आहे. अन्य पर्यायी व्यवस्था ग्रामपंचायतकडे नाही. सावरखेड येथून पिंगळा गडावर मजीप्राची पाईपलाईन व जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथूनच नेरपिंगळाईला नियमित पाणीपुरवठा होतो व ही पाईपलाईन सावरखेडवरूनच जात असल्याने याद्वारे दहा तास नेरपिंगळाईला पाण्याचा पुरवठा होतो. ही वेळ वाढवून दिल्यास सावरखेडला नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो. जर ही व्यवस्था होत नसल्यास पिंगळाई गडावरून ४ किमी स्वतंत्र पाईपलाईन टाकून द्यावी व यासाठी मजीप्राचा पाणी कर भरण्यास ग्रामस्त तयार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकाºयांना स्पष्ट करण्यात आले. अन्यथा सदर पाईपलाईन फोडून गावकरी पाणी घेतील, असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सरपंच गजानन खुळे. उपसरपंच विद्या आठवलेंसह शेकडो नागरिक उपस्थित होते.नागरिकांचा ठिय्यासावरखेडला मजीप्राच्या पाईपलाईनमधून पाणी देण्यास अमरावती महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी सायंकाळी पाचपर्यंत घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्याचे सावरखेडवासीयांनी सांमगितले. मात्र, सायंकाळनंतरही ही परवागी न मिळाल्याने वृत्त लिहितोवर शेकडो महिला व पुरूषांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या सुरूच आहे.
सावरखेडवासीयांचा जिल्हा कचेरीवर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 10:55 PM
मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिं) या गावाला पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटल्याने १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावातून नेरपिंगळाई तेथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाणी देण्यात यावे. या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्याने उशिरापर्यंत ग्रामस्थांनी जिल्हा कचेरीत ठिय्या दिला.
ठळक मुद्देपाणी पेटले : तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचा उशिरापर्यंत हालचाली