अमरावती : गत काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिंलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारचे जनहित विरोधी धोरण याला कारणीभूत आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे आदीच्या नेतूत्वात जिल्हा परिषदेपासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीने परिसर दाणाणून सोडला.
महागाई विरोधात जे आंदोलन करत होते. तेच सरकार आज केंद्रात ७ वर्षांपासून सत्तेवर आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅस सिंलिडरचे दर होते. तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे, केंद्रात सत्तासुख भोगत असलेल्या भाजप सरकारला आता सत्तेतून हटविण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्या जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित सायकल रॅलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त करीत कधी नव्हे एवढी इंधन दरवाढ आणि सिंलिडरचे दर सर्वसामान्याना दाखविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून बुरे दिन जनतेला पाहावे लागत आहेत. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. रॅलीत सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, हरिभाऊ माेहोड, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, महेंद्रसिंग गैलवार, सुरेश निमकर, गणेश आरेकर, मोहन सिंगवी, नितीन दगडकर, नितीन गोंडाणे, प्रमोद दाळू, बबलू काळमेघ, सुधाकर खारोडे, प्रशांत वानखडे, सुरेश आडे, अनंत साबळे, प्रदीप देशमुख, गिरीश कराळे, राहुल येवले, सागर देशमुख, पंकज मोरे आदी सहभागी झाले होते.
बॉक्स
झेडपी सभापतीस पोलिसात तू-तू, मै-मै
विभागीय आयुक्त कार्यालयात सायकल रॅली पोहोचताच आयुक्ताकडे निवेदन देण्यास गेलेल्या निवडक शिष्टमंडळाला पोलिसांनी गेटमधून सोडले. परंतु काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखल्यावरून वातावरण तापले. अशातच झेडपी सभापती बाळासाहेब हिंगणीकर व गाडगेनगरचे पाेलीस अधिकारी चोरमले यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रकरणी ना. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मध्यस्थी केली.